Happy Propose Day : ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. या क्रमाने आज 8 फेब्रुवारी म्हणजेच प्रपोज डे आहे. या दिवशी लोक त्यांच्या भावना व्यक्त करतात. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल आणि आजपर्यंत तुम्ही तुमच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करू शकत नसाल, तर आजचा दिवस खास आहे, जेव्हा तुम्ही बोलू शकता. गुडघ्यावर बसून ‘माझी होशील का?’, असं चारचौघांमध्ये केलेलं प्रपोज म्हणजे बॉलिवूडमधील चित्रपटांचं वैशिष्ट्य. चित्रपटानंतर असे प्रपोज अनेकांनी त्यांच्या आयुष्यात केले. मात्र कितीही धीर एकवटला तरी, चारचौघात ती नाही म्हणाली, तर काय?, ही भीती मनात असतेच. मात्र एका पायलटनं हजारो फूट उंचीवर विमानात गर्लफ्रेंडला प्रपोज केलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.

व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी प्रपोज डे साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या खास व्यक्तीकडे आपल्या भावना व्यक्त करतात. याच प्रपोज डे ला एक मेक्सिकन पायलट त्याच्या प्रेयसीला लग्नाचा प्रस्ताव देताना दिसत आहे. प्रेमाने भरलेली ही पोस्ट पाहिल्यानंतर लोक जोरदार कमेंट करत आहेत. व्हायरल पोस्टमध्ये, सुरुवातीला एक महिला विमानात तिच्या डेस्कवर बसलेली दिसते, या दरम्यान मेक्सिकन भाषेत घोषणा होऊ लागते. जेव्हा त्या महिलेला समजते की तिच्यासाठी घोषणा केली जात आहे आणि जेव्हा तिला स्पीकरकडून तिच्या जागेवरून उभे राहण्याचा आदेश मिळतो तेव्हा ती लगेच तिच्या जागेवरून उठते. डोक्यावर टोपी घातलेला पायलट त्याच्या मैत्रिणीसमोर येताच गुडघ्यावर बसतो. मग तो त्याच्या खिशातून अंगठीचा बॉक्स काढतो आणि तिला लग्नासाठी प्रपोज करतो. हे सर्व पाहून ती तरुणी इतकी आनंदी होते की तिचे डोळे अश्रूंनी भरून येतात. मग दोघेही एकमेकांना मिठी मारतात.

तिनं लगेच होकार दिला आणि ही ‘लव्ह इज इन द एअर’ प्रकारातील घटना पाहणाऱ्या प्रवाशांनी दोघांचंही अभिनंदन केलं.या विमानातून आता दोघांच्या आयुष्यरुपी प्रवासाचा नवा टप्पा सुरू झाला.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर mr_sushant__14 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “खूप नशीबवान मुलगी आहे ही”

Story img Loader