Harayana Election Result 2024 : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या दोन्ही राज्यांत विधानसभेच्या ९०-९० जागा आहेत. यात बहुमताचा आकडा ४६ आहे, आत सर्वजण या निवडणुकीच्या अंतिम निकालाची वाट पाहत आहे. कारण दोन्ही राज्यांत अनेक दिग्गज राजकीय नेते निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही लढत आता भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंतची आकडेवारी पाहता, हरियाणात भाजपाची विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये सध्या तिथला स्थानिक पक्ष जेकेएन आघाडीवर आहे. एकूणच संपूर्ण देशाचे लक्ष हे आता या निवडणूकाचा अंतिम निकाल काय येतो याकडे आहे; तर दुसरीकडे सोशल मीडियावरही या निकालाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला आघाडी मिळत असताना पंतप्रधान मोदींच्या जुन्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पीएम मोदी असे म्हणताना ऐकायला मिळतं की, “ज्यादा से ज्यादा मेरा क्या करे लेंगे भाई… नहीं-नहीं बताइए क्या कर लेंगे! अरे हम तो फकीर आदमी हैं, झोला लेके चल पडेंगे जी…” हे वाक्य सर्वाधिक चर्चेत आलं आहे.
Read More News : Haryana Election Result 2024: हरियाणात भाजप की काँग्रेस? सोशल मीडियावर ‘या’ पक्षाच्या विजयाचा दावा, काय म्हणतायत लोक, वाचा
लोक हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करत आहेत. अनेक जण हरियाणातील भाजपाचे भवितव्य लक्षात घेत हा व्हिडीओ पहात आहेत. अनेक युजर्सनी हा व्हिडीओ शेअर करत म्हणत आहेत की, मोदीजी झोळी घेऊन निघून जातील, पण अंध भक्तांचे काय होणार?
या व्हिडीओवर युजर्सही अनेक कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘अरे मेरा क्या है मैं तो फकीर आदमी हूं झोला उठा कर चल दूंगा…! असे म्हणणाऱ्या पीएम मोदीजींची इच्छा हरियाणाची जनता पूर्ण करेल. मोदीची मला सांगा, उद्या तुम्ही हरियाणात किती जलेबी वाटणार?
(लोकसत्ता.कॉम या व्हायरल व्हिडीओची पुष्टी करत नाही)