Hardik Pandya Dance At Anant Ambani Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात अनेक क्रिकेटर्सनीही हजेरी लावली होती. सर्व क्रिकेटपटू आपापल्या कुटुंबीयांसह लग्नसोहळ्यासाठी पोहोचले. यादरम्यान टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याही त्याचा भाऊ कृणाल पंड्या आणि मेव्हणीसह हजर झाला होता. याचदरम्यानचा हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत हार्दिक बेभान होऊन नाचताना दिसतोय.

या व्हिडीओमध्ये हार्दिक पंड्या बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेसह जबरदस्त ठुमके लगावताना दिसत आहे. पण, पंड्यासह त्याची पत्नी नताशा न दिसल्याने आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
Reshma Shinde Wedding Video writes special kannda msg
Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेसेज, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…
devmanus fame kiran gaikwad will get marry with vaishnavi kalyankar on 14 december
Video: मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, मजेशीर व्हिडीओ शेअर करत तारीख केली जाहीर

अनंत-राधिकाच्या लग्नात हार्दिक पंड्याचा देसी अंदाज (Hardik Pandya Dance Ambani Wedding)

हार्दिक पंड्याचा अनन्या पंड्याबरोबर बॉलीवूडच्या गाण्यांवर भारी डान्स मूव्ह्ज (Hardik Pandya Ananya Pandey Dance Video)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला माजी कर्णधार एम. एस. धोनी, माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल, ईशान किशन, कृणाल पंड्या यांच्यासह हार्दिक पंड्यानेही हजेरी लावली होती. यावेळी हार्दिक पंड्याने आपल्या जबरदस्त डान्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पंड्या बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेबरोबर चक्क जमिनीवर बसून बॉलीवूडच्या गाण्यांवर भारी डान्स मूव्ह्ज करताना दिसला. यावेळी त्यांच्याबरोबर दोन तरुणही नाचताना दिसले. आता सोशल मीडियावरही हार्दिकच्या यावेळच्या डान्स व्हिडीओंची खूप चर्चा रंगतेय. चाहत्यांनाही त्याच्या या डान्स व्हिडीओंना खूप पसंती दिली आहे. यापूर्वी हार्दिकने अनं -राधिकाच्या संगीत सोहळ्यालाही हजेरी लावली होती.

More Stories On Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या संपत्तीतील इतका मोठा हिस्सा होणार नताशाच्या नावे? घटस्फोटाच्या चर्चेत नवा ट्विस्ट

हार्दिक तुझी बायको कुठेय? व्हिडीओंवर चाहत्यांच्या कमेंट्स ( Hardik Pandya Troll)

हार्दिक पंड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत आहे. अलीकडेच झालेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये पंड्या पत्नीसह दिसला नाही. त्यावरून दोघांनी घटस्फोट घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या जोडप्याने अद्याप त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही सांगितलेले नाही; पण नताशाने अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट शेअर करीत स्वत:ला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक आपल्या मुलासह सेलिब्रेशन करताना दिसला होता. यावेळीही त्याची पत्नी कुठेच दिसली नाही. यावरून युजर्स आता हार्दिक पंड्या तुझी बायको कुठे आहे, असा सवाल विचारताना दिसत आहेत.

हेही वाचा – “गुजराती ब्रेन”, घटस्फोटानंतरही नताशाला मिळणार नाही हार्दिकच्या संपत्तीतील ७० टक्के हिस्सा? नेटकरी म्हणाला, “भावाने आयुष्यभर….”

हार्दिकचे अंबानी कुटुंबाशी खास नाते (Hardik Pandya and the Ambani family’s special bond)

हार्दिक पंड्याचे अंबानी कुटुंबाशी खास नाते आहे. आयपीएल टीम मुंबई इंडियन्स ही नीता अंबानींची टीम आहे आणि हार्दिकने त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात मुंबई इंडियन्समधूनच केली होती. त्याशिवाय पंड्याला आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनविण्यात आले होते.

Story img Loader