भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात निवड समितीकडून विश्रांती दिलेल्या हार्दिक पांड्याचा नवीन लूक समोर आला आहे. इनस्टाग्राम अकाऊंटवर हार्दिक पांड्याने हातावर काढलेल्या नवीन टॅटूसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. जंगलाचा राजा असलेल्या सिंहाचा टॅटू हार्दिकने आपल्या हातावर काढला आहे. नेटकऱ्यांनीही हार्दिकच्या या टॅटूला आपली पसंती दर्शवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याला भारतीय संघात जागा देण्यात आली होती. मात्र उपांत्य सामन्यात, मोक्याच्या क्षणी हार्दिक आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. भारताच्या आगामी विंडीज दौऱ्यात निवड समितीने हार्दिकला विश्रांती देत त्याचा भाऊ कृणालला संघात स्थान दिलं आहे.

Story img Loader