हार्दिक आणि कृणाल पांड्या हे भारतीय संघातले सर्वात स्टाईलीश खेळाडू म्हणून ओळखले जातात. इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धा पार पडल्यानंतर, विंडीज दौऱ्यासाठी निवड समितीने हार्दिक पांड्याला विश्रांती दिली होती. कृणाल पांड्याला विंडीज दौऱ्यात टी-२० संघात स्थान मिळालं होतं. या दौऱ्यात कृणालने अष्टपैलू कामगिरी करत आपली निवड सार्थ ठरवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पांड्या बंधूनी नुकतीच एक अलिशान लॅम्बॉर्गिनी गाडी विकत घेतली आहे. भगव्या रंगाच्या आपल्या या गाडीतून हार्दिक आणि कृणाल यांनी नुकताच मुंबईच्या रस्त्यांवर फेरफटका मारला. वांद्रे येथे एका कामासाठी आलेले असताना, हार्दिकच्या या अलिशान गाडीचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya krunal pandya spotted in orange lamborghini in mumbai watch psd
Show comments