भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज हार्दिक पांड्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे कालपासूनच सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला. फोटोमध्ये त्याच्यासोबत दिसणारी तरुणी नेमकी कोण? हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना होती. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हार्दिकचं नाव परिणीती चोप्रा आणि लिशा शर्मा यांच्यासोबतही जोडलं गेलं. हार्दिकने आपल्या नात्याला कधीच दुजोरा दिला नाही. एकंदरच हार्दिकच्या नात्यांवर चर्चा रंगत असताना इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून त्याने चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढवली.

वाचा : मुरली विजयला पुत्ररत्न, मित्राच्या गर्भवती पत्नीसोबत केला होता विवाह

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हार्दिकने त्याच्या किशोरवयातील एक फोटो शेअर केला होता. त्यात दिसणाऱ्या मुलीचा चेहरा हा आताच्या फोटोंशी अगदी मिळता जुळता होता. तेव्हा लोकांची उत्सुकता अधिकच वाढली. कदाचित ही पांड्याची बालमैत्रिण असेल किंवा हार्दिक तिला डेट करत असावा, अशा प्रकारच्या चर्चाही दिवसभरात रंगल्या. पण पांड्यासोबत असणाऱ्या ‘मिस्ट्री गर्ल’चं कोडं काही सुटलं नाही.
पण दिवसभर सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चा पाहून पांड्यानेच शेवटी आपल्या नात्याचा खुलासा केला. ‘तुमचं कोडं सुटलं आहे. ही मुलगी माझी बहिण आहे’ असं ट्विट हार्दिकने केलं आहे. काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आणि हार्दिक पांड्या यांच्यात प्रेम फुलत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर ऐकायला मिळाल्या.

Viral Video : ‘ती’ ब्रिटनच्या प्रिन्सजवळील पॉपकॉर्न चोरी करते तेव्हा…

मात्र, दोघांनी हे वृत्त फेटाळून लावले. त्यानंतर २२ वर्षीय मॉडेल लिशा शर्माला तो डेट करत असल्याची चर्चा होती. पण आम्ही दोघं चांगले मित्र आहोत, असे सांगत लिशाने या चर्चांना पूर्णविराम दिला.

Story img Loader