Asia Cup 2022 Ind vs Pak: भारत- पाकिस्तान सामन्याच्या वेळी हार्दिक पांड्याने शेवटचा षटकार ठोकण्याआधी दिलेली एक प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हार्दिकचा शांत व संयमी चेहरा पाहून त्याच्या आत्मविश्वासाची अनेकजण दाद देत आहेत. पण सामन्याविषयी पूर्ण विश्वास असणारा हार्दिक एकटाच नाही तर त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिक सुद्धा आपल्या पतीच्या दमदार खेळीविषयी खात्रीशीर होती. म्हणूनच एकीकडे भारत विरुद्ध पाकिस्तान अटीतटीचा सामना रंगत असताना नताशा मात्र निवांत पार्टीचे फोटो पोस्ट करत होती. नताशाने जिंकण्याआधीच केलेल्या या जोरदार पार्टीतील तिचा लुक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना कायम भूरळ घालते. अनेक महत्त्वाच्या सामन्यांना नताशा सुद्धा हार्दिकला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडीयम मध्ये दिसून आली आहे. कालच्या सामन्याच्या वेळी जरी नताशा उपस्थित नसली तरी सामान्यातील मॅन ऑफ द मॅच हार्दिक पांड्याला मिळताच त्याच्या पत्नीने सुद्धा सोशल मीडियावर फोटो शेअर करून आपल्या पतीला शाबासकी दिली आहे.
Ind vs Pak सामन्याच्या वेळी नताशाची पार्टी
नताशाने हार्दिकचा फोटो शेअर करून वर तू माझा स्टार आहेस व मला तुझा अभिमान आहे असे कॅप्शन लिहिले आहे. तर हार्दिकने शेअर केलेला एक फोटो सुद्धा नताशाच्या स्टोरी मध्ये पाहायला मिळत आहे. यात गंभीर दुखापतीवर मात करून कशाप्रकारे हार्दिकने पुनरागमन केले हे दिसून येत आहे.
हेही वाचा – Viral Video: कॉन्फिडन्स असावा तर असा! विजयी षटकार मारण्याआधी पांड्याने केलं असं काही की…
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात हार्दिकने गोलंदाजी व फलंदाजी दोन्ही बाजूंनी टीम इंडियाला उचलून धरले होते. तीन विकेट व १७ चेंडूत ३३ धावा काढत पांड्या कालच्या सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.