Harishchandragad video: पावसाळा आणि पर्यटन हे एक समीकरण आहे. विकेंडला पर्यटक बाहेर एखाद्या धबधब्यावर किंवा ट्रेकिंगला जातात. हल्ली तर पावसाळ्यात ट्रेकिंगला अक्षरश: उत येतो. शहरात किंवा रिसॉर्टवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सुटीच्या दिवशी आता किल्ल्यांवर गर्दी होऊ लागली आहे. अनेकांनी या विकेंडला ट्रेकिंगला जाण्याचे प्लॅन केले असतील, मात्र त्या आधी हरिश्चंद्रगडावरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रायगडावर ढगफुटी झाल्यानंतर गडाला धबधब्याचं स्वरूप आलं होतं; यानंतर आता हरिश्चंद्रगडावरही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरिश्चंद्रगडाचा व्हिडीओ समोर

पावसाळ्याला खरी सुरुवात झाली आहे. निसर्गाने हिरवा शालू परिधान केला आहे. गड, किल्ले अन् धबधबे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. शनिवार, रविवारी मोठ्या संख्येने युवक, युवती पर्यटनासाठी बाहेर पडत आहे. विकेंड साजरा करणाऱ्यांची मोठी गर्दी वर्षापर्यटनाच्या स्थळी होत आहे. यामुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प होणे, गड किल्ल्यांवर अडकून राहण्याचे प्रकार यादरम्यान घडत असतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी (३० जून) घडली होती. ही घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली. याच पार्श्वभूमीवर आता हरिश्चंद्रगडाचा व्हिडीओ समोर आला आहे.

पर्यटकांना जाण्यास बंदी

तुम्हीही जर या दिवसांमध्ये हरिश्चंद्रगडावर जायचा प्लॅन करत असाल तर थांबा, आधी हा व्हिडीओ पाहा अन्यथा पर्यटनाच्या आनंदाऐवजी अडचणींना समोरे जावे लागेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मागच्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात तुफान पाऊस पडला आहे. याच पावसात रायगडावरही ढगफुटी झाली होती, यानंतर आता हरिश्चंद्रगडावरही पावसाचे पाणी धबधब्याप्रमाणे वाहत आहे. या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी केली असून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Gujrat VIDEO: ही गर्दी नाही बेरोजगारी; जागा ५ उमेदवार हजारो, गुजरातमध्ये खासगी कंपनीच्या मुलाखतीत चेंगराचेंगरी

हरिश्चंद्रगडाला अहमदनगर जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हटले जाते. पर्यटकांचे आवडते ठिकाण हा गड आहे. अकोले तालुक्यात हा गड येतो. पुण्यापासून हरिश्चंद्रगडाचे अंतर १६३ किलोमीटर आहे. मुंबईवरून २०१ किलोमीटर अंतरावर हरिश्चंद्रगड आहे. भंडारदऱ्यापासून फक्त १६ किलोमीटरवर गड आहे, तर नाशिकवरून ६७ किलोमीटरवर हा गड आहे. यामुळे नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटक विकेंडसाठी या ठिकाणी येतात. परंतु शनिवार, रविवारी होणारी गर्दी पाहूनच पर्यटनाचे नियोजन करायला हवे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harishchandragad in monsoon harishchandragad trek video harishchandragad shocking video goes viral on social media srk