महामार्गावरील ५०० मीटरच्या परिसरात असेली दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहे. याआदेशानुसार या परिसरात असलेल्या हॉटेल्स किंवा बारमध्ये दारूची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे, या निर्णयाचे सगळीकडूनच स्वागत होत आहे अशा वेळी या लढाईत मोलाचे योगदान दिलेल्या हरमन सिद्धू यांना विसरून चालणार नाही. कारण महामार्गावर असणारी दारूनची दुकाने बंद करण्यासाठी त्याने गेले अनेक वर्ष लढा दिला आहे आणि अखेर सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाने त्यांचा हा लढा सफल झाला आहे. काही वर्षांपूर्वी हरमन सिद्धू आपल्या काही मित्रांसोबत जंगल सफारीला गेले होते, पण पक्क्या रस्त्याने न जाता त्याने आडवाटेचा रस्ता धरला. जागा निसरडी होती त्यामुळे त्यांची गाडी दरीत कोसळली. या अपघाताच्या वेळी त्यांचे मित्र कसेबसे बचावले पण हरमन यांना कायमचे अपंगत्त्व आले. १९९६ ची ही घटना, वयाच्या २६ वर्षी या तरुणाला कायमचे अपंगत्त्व आले. आपल्या नशीबाला ते सारखे दोष द्यायचे पण एका घटनेने मात्र त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा