लोकल, बस, रिक्षा, उबर-ओला कॅब मधून दररोज लाखो महिला प्रवास करतात. यादरम्यान अनेकदा महिलांबरोबर गैरवर्तनाच्या घटना समोर येतात. त्यामध्ये मौल्यवान वस्तूची चोरी होणं, मुद्दामून धक्का देणं, महिलांकडे वाईट नजरेनं पाहणं, छेडछाड, त्यांच्यावर नजर ठेवून असणं, पाठलाग करणं आदी अनेक गोष्टी घडतात. पण, महिला स्वतःच्या गाडीत सुद्धा सुरक्षित नाहीत का ? असा प्रश्न आज उपस्थित झाला आहे. सोशल मीडियावर एका महिलेनं तिच्याबरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. चार पुरुषांनी एका महिलेचा जवळजवळ ७ किमीपर्यंत पाठलाग केल्याची घटना घडली आहे,

हरमीन सोच ही शिक्षिका राष्ट्रीय महामार्गावरून गाडी चालवत होती. तेव्हा स्कॉर्पिओ एसयूव्हीमधील चार पुरुषांनी तिचा पाठलाग केला. अगदी ७ किमीपर्यंत अज्ञात पुरुष महिलेचा पाठलाग करत होते. महिला चकवा देण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबली. पण, यावेळी चार पुरुष कुठेतरी रस्त्यावर थांबले जेणेकरून महिलेला संशय नाही येणार. पुन्हा महिलेने हायवेवर तिचा प्रवास सुरु केला. हायवेवर गाडीचा वेग वाढवणे तिच्या स्वतःच्या संरक्षासाठी घातक ठरू शकले असते. त्यामुळे त्या क्षणी नक्की पोलिसांना बोलवावे की,गाडीचा स्पीड वाढवावा हे महिलेला कळायला काही मार्ग उरला नव्हता. एकदा पाहा ही व्हायरल पोस्ट.

Chunabhatti viral video
Video: जिगरबाज महिला पोलिसाचं धाडस, मृत्यूच्या जबड्यातून प्रवासी महिलेला वाचवलं; काळाजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ पाहिलात का?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
accident video viral
“एक चूक अन् खेळ खल्लास!” भरधाव वेगाने आला, अचानक घसरली बाईक, रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलींना…थरारक अपघाताचा Video Viral
Gang of women arrested stealing from Hyderabad Express in manmad
हैदराबाद एक्स्प्रेसमध्ये चोरी करणारी महिलांची टोळी ताब्यात
accident to Vehicle of devotees returning from Mahakumbh on Samruddhi Highway
‘समृद्धी’वर चालकाला लागली डुलकी, कुंभतून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला!
Traffic Police Towing ladies scooty in pune watch happened next video goes viral
पुणेकरांचा नाद नाय! नो पार्किंग’मधली स्कूटी पोलिसांनी उचलली; त्यानंतर महिलेनं काय केलं पाहा, VIDEO होतोय व्हायरल
Mahakumbh Mela Video Viral Women Fight While Traveling To Prayagraj By Train shocking video goes viral
“अरे पाप धुवायला जाताय की करायला?” कुंभमेळ्याला जाताना महिलांनी ट्रेनमध्ये अक्षरश: हद्दच पार केली; VIDEO पाहून बसेल धक्का
Domino Effect Crash Sudden Scooty Brake Causes Multi-Vehicle Pileup Internet Reacts WATCH
“वो स्त्री है कुछ भी कर सकती है…” भररस्त्यात दुचाकीस्वार काकूंनी अचानक मारला ब्रेक, एकमेकांना धडकल्या मागून येणाऱ्या गाड्या, विचित्र अपघाताचा Video Viral

हेही वाचा…मद्यधुंद अवस्थेत पळवली कार, दुचाकीस्वारास दिलं उडवून अन्…. थरारक घटनेचा VIDEO पाहून फुटेल घाम

पोस्ट नक्की बघा…

पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, पोलिसांना बोलवायचे की गाडी चालवायची या मन:स्थितीत असताना तिने गाडीचा वेग वाढवण्याचा विचार केला. स्कॉर्पिओ एसयूव्हीने महिलेला मागे टाकण्यासाठी पुन्हा वेग वाढवला आणि मग महिलेनं शेवटच्या क्षणी इंडिकेटरशिवाय डावीकडे गाडी वळवली. ज्यामुळे चार पुरुष बसलेली स्कॉर्पिओ एसयूव्ही गाडी एलिव्हेटेड रोडवर गेली आणि महिलेची गाडी स्लिप रोडवर. जेव्हा दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले तेव्हा महिलेच्या जीवात जीव आला व तिचे गुडघे थरथरू लागले. असा सर्व प्रसंग तिने पोस्टमध्ये सविस्तर सांगितला आहे आणि उंदीर आणि मांजरच्या खेळाची याला उपमा दिली आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट @HarmeenSoch या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही घटना पंजाबमध्ये घडली आहे. या घटनेवर विचार करताना महिलेनं असे लिहिले की, ‘काही पुरुषांसाठी असं करणे अगदीच मनोरंजक ठरते. पण, अनेक दिवस महिलांच्या मनात या गोष्टी घर करून राहतात आणि त्यांना त्रास देतात; याची पुरुषांना जाणीव सुद्धा नसेल ही खात्री आहे’ ; अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे. नेटकऱ्यांनी ही पोस्ट पाहून महिलेला अशा परिस्थिती असल्यावर काय केलं पाहिजे हे उपाय सुचवताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.

Story img Loader