रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका महिलेला दुसऱ्या व्यक्तीने धक्का देऊन जणू काही घडलंच नाही असा आव आणून तिथून पळ काढला. त्याच्या धक्क्यामुळे ती महिला प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रुळावर पडली. सुदैवाने ट्रेन यायला काही मिनिटांचा अवधी असल्याने ती थोडक्यात वाचली. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

येथे पैशाने चक्क ‘शोऑफ’ विकत घेता येतो

या महिलेचे वय जवळपास ५० हून अधिक असल्याचं समजते आहे. हाँगकाँगमधल्या एका स्टेशनवर ती सफाई कर्मचाऱ्याचं काम करते. समोरच्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या दुसऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याला ती सूचना देत होती. यावेळी मागून येणाऱ्या एका व्यक्तीने तिला पाठीमागून जोरात धक्का दिला. प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ही महिला रेल्वे रुळावर पडली. यात तिला गंभीर जखमा झाल्यात. सुदैवाने ट्रेन यायला बराच वेळ असल्याने ती वाचली, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. प्लॅटफॉर्मवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही दृश्ये कैद झाली. तिला ढकलल्यानंतर या व्यक्तीने जणू तिथे काहीच घडलं नाही असा आव आणत तिथून पळ काढला.

Viral : मंदिराच्या दानपेटीतलं ते प्रेमपत्रं झालं व्हायरल

सीसीटीव्हीमधील दृश्य पाहून पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे, असं करण्यामागे त्याचा उद्देश काय होता हे मात्र कळू शकलं नाही. त्या महिलेला आपण ओळखत नसल्याने आरोपीने पोलिसांच्या चौकशीत कबुल केलं. असाच काहीसा प्रकार महिन्याभरापूर्वी ब्रिटनमध्येही घडला होता. जॉगिंग ट्रॅकवरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या महिलेला एका तरुणाने ट्रॅकबाहेर ढकलून दिलं होतं. ट्रॅकच्या बाजूनं वाहनांची ये-जा सुरू होती. ही महिला बसखाली येणार होती, पण प्रसंगावधानता दाखवत बस चालकाने ब्रेक लावला आणि ही महिला थोडक्यात वाचली.

Story img Loader