देशातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नेहमी त्याच्या चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असतो. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डिजीटल जप माळ दिसत आहे. यामध्ये एक व्यक्ती डिजीटल जप माळ फिरवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्तीच्या हातात एक वस्तू आहे. हा व्हिडिओ शेअर करताना देशातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी लिहिले आहे “माळ( जप -माळ) सुद्धा डिजिटल आहे, वाह भारत.” डिजीटल जपमाळ पाहून गोएंका थक्क झाले आहेत.
या व्हिडीओवर ३ लाखांपेक्षा जास्त वेळा लोकांनी पाहिला आहे आणि ते या व्हिडिओवर अनेक लोकांचे कमेंट्स पाहत आहेत. एकाने कमेंट केली आहे,”खूप छान व्हिडिओ आहे.” एका अन्य यूझरने लिहिले आहे, “देवाचे भक्तही डिजिटल झाले आहेत.”
या व्हिडीओमध्ये जी डिजिटल माला दाखवली जात आहे ती खूप खास आहे. त्याचा वापर जप माळा म्हणून केला जातो. यात डिजिटल स्क्रीन आहे. ही माला फिरल्यानंतर डिजिटल स्क्रीनवर किती वेळा फिरवली हे मोजले जाते. जप करताना लोक ११, २१ आणि १०८ वेळा मंत्र उच्चारण करतात. अशावेळी ही जपमाळ वापरली जाते. सहजा जपमाळ करता आपल्याला मंत्र उच्चारन करताना एक मणी पुढे सरकावून संख्या मोजावी लागते पण या डिजीटल स्क्रिनवर मणी पुढे सरकवाल्यानंतर आपोआपो संख्या मोजली जात आहे त्यामुळे मंत्र उच्चार करणे सहज शक्य होत आहे.