Doppelganger Of CM Eknath Shinde: उद्योगपती हर्ष गोयंका हे त्यांच्या मजेदार आणि तितक्याच वैशिष्ट्यपूर्ण ट्विट्ससाठी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी ट्विट केलेला असाच एक फोट सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. हर्ष गोयंका यांनी ट्विट केलेल्या या कृष्णधवल फोटोमध्ये ते स्वत: आणि महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. या फोटोसहीत हर्ष गोयंकांनी लिहिलेली कॅप्शनही तितकीच खास आहे.

नक्की पाहा >> Video: मुसळधार पाऊस, डोक्यावर गुलाल अन् ढोल… ढोलवादन करत मिसेस मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंचं स्वगृही स्वागत

हर्ष गोयंकांनी शेअर केलेल्या फोटोच्या उजव्या बाजूला ते स्वत: तर डाव्या बाजूला एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. फोटोमध्ये हे दोघेही एकमेकांकडे पाहतायत असं वाटतंय. हे दोन्ही फोटो अगदी जवळून काढलेले म्हणजेच क्लोजअप आहेत. हा फोटो गोयंका यांनी रविवारी पोस्ट केला आहे. म्हणजेच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवसांनी. या फोटोसोबत गोयंकांनी जय महाराष्ट्र असंही लिहिलं आहे. अर्थात या फोटोतून त्यांना शिंदे आणि स्वत:च्या दिसण्यामध्ये किती साम्य आहे हे अधोरेखित करायचं आहे. फोटोला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये गोयंकांनी एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेचा संदर्भ दिलाय.

नक्की वाचा >> “…बदल्यात तुमच्या पाया पण पडू”; अजित पवारांचा Video शेअर करत निलेश राणेंचं वक्तव्य

“जे मला भेटायला येत आहेत त्यांना होणाऱ्या तसदीबद्दल मी क्षमस्व आहे. मला माहितीय माझी झेड प्लस सुरक्षा ही त्रासदायक ठरत आहे. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे. जय महाराष्ट्र!”, अशी कॅप्शन गोयंका यांनी या फोटोला दिलीय.

नक्की पाहा >> Photos: शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेकांनी केला प्रयत्न, अगदी राज ठाकरेही ठरले अपयशी; पण एकनाथ शिंदेंनी…

गोयंका यांनी पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. काहींनी फक्त तुमच्या दोघांचं हसणं वेगळं असल्याचं म्हटलंय. एकनाथ शिंदे तुलनेनं फार कमी वेळा हसतात तर तुमचा चेहरा फारच हसरा आहे, असं एकाने म्हटलं आहे. तर अन्य एकाने तुम्ही कधी कुंभमेळ्याला गेला होता का असा प्रश्न गोयंकांना विचारलाय. बऱ्याच जणांनी तुम्ही फार कमालीचे एकसारखे दिसता असं कमेंट्समध्ये म्हटलं आहे. काहींनी गोयंकांच्या कल्पनाशक्तीला दाद दिली आहे.

Story img Loader