आनंदाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. कोणासाठी पाऊस हा आनंद देणारा, तर एखाद्याला नकोसा वाटणारा. कोणासाठी नवनव्या जागी फिरणे म्हणजे आनंद तर कोणासाठी घरात स्वतःच्या कम्फर्टमध्ये, शांततेत दिवस घालवणे म्हणजे सुख. कोणासाठी महागड्या गाड्या वापरणे म्हणजे आनंद तर आपल्या माणसांसोबत घालवलेला वेळ म्हणजे काही जणांसाठी खरा आनंद. अशी प्रत्येक व्यक्तीप्रमाणे याची वेगवेगळी व्याख्या. पण अनेकजण दुसऱ्या व्यक्तींमध्ये आनंद शोधत असल्याचे जाणवते. अशा व्यक्तींसाठी उद्योगपती हर्ष गोएंका यांनी एक सल्ला दिला आहे. काय आहे हा सल्ला जाणून घेऊया.
हर्ष गोएंका यांनी एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमधले वाक्य अमुल्य संदेश देणारे आहे. या वाक्यामध्ये थोडा बदल करण्यात आल्याचे दिसत आहे. आधीचे वाक्य ‘अशा व्यक्तीसोबत राहा जी व्यक्ती तुम्हाला आनंदी ठेवू शकेल’ असा आहे. पण यामध्ये थोडा बदल करून या वाक्याला वेगळा अर्थ देण्यात आला आहे. यातील एक शब्द गाळून तयार झालेल्या वाक्याचा अर्थ ‘तुम्हाला आनंदी ठेवू शकेल अशी व्यक्ती स्वतः व्हा’ हा आहे. एका शब्दाच्या फरकाने या वाक्यातून मोलाचा संदेश दिला जात आहे. तर हर्ष गोएंका यांनी ‘आनंद इतरांमध्ये न शोधता स्वतःमध्ये शोधा’ या अर्थातचे कॅप्शन दिले आहे. हे ट्वीट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : लॉकडाउनमध्ये केलेल्या मदतीची त्याने ठेवली जाण; अनोख्या मैत्रीचा Viral Video एकदा पाहाच
हर्ष गोएंका यांचे ट्वीट :
या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आनंदाबद्दल त्यांना काय वाटते हे सांगितले आहे. पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :
आणखी वाचा : दैव बलवत्तर म्हणून… काम सुरू असताना लॅपटॉपचा स्फोट झाला अन्… तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात
हर्ष गोएंका यांनी शेअर केलेली ही आनंदाची व्याख्या अनेकांना पटली असून हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.