लोकांचे समर्थन मिळवण्यासाठी राजकारणी कुठल्याही थराला जाऊ शकतात याचे ताजे उदाहरण तेलंगणातून पुढे आले आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) नेते राजानाला श्रीहरी हे लोकांना मद्य आणी कोंबडी वाटप करताना एका व्हिडिओत दिसून येत आहे. दसराच्या अगोदरच्या दिवशी त्यांनी लोकांना हे उपहार दिले होते. याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे हासू हासू पोट दुखत आहे.

उद्योगपती हर्ष गोएनका यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. राजकारण्यांद्वारे फुकट उपहार देण्याचे हे अनोखे उदाहरण असल्याचे हर्ष गोएनका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. व्हिडिओमध्ये वरंगल येथे उपहार मिळण्यासाठी रांगेत लागलेल्या लोकांना पुढारी मद्याची बाटल आणि जीवंत कोंबडी देत असल्याचे दिसून येत आहे. मद्याचे सेवन करू नये असा सल्ला देण्याऐवजी पुढारीच जनतेला मद्य वाटप करत असल्याचा चुकीचा प्रकार घडला आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”

(Viral : श्वानाने पिलाला खेळण्यासाठी दिला बॉल, उत्साही पिलाने जे केल ते पाहून तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल)

नेटकरी व्हिडिओ पाहून अवाक

हा व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक झाले आहेत. त्यांनी व्हिडिओतील नेत्याची भरपूर थट्टा केली. तर काहींनी या कृत्याचे निषेध देखील केले. या उपहाराचे लवकर परिणाम मिळतील, असा विनोद एका युजरने केला आहे, तर कॅमेऱ्यासमोर मद्य वाटप करण्याचे धाडस दाखवणाऱ्या नेत्याला पाहून एका युजरने आश्चर्य व्यक्त केले आहे. तर प्रोटिन, फॅट, कार्बोहायड्रेट, व्हिटामिन आणि मिनरल्स जेव्हा मद्यासोबत एकत्र होतात तेव्हा ‘व्होटिंग इफेक्ट’ मिळतो अशी थट्टा एका युजरने केली.

उल्लेखनीय म्हणजे, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या राष्ट्रीय पक्ष सुरू करणार होते. त्याच्या आदल्या दिवशी हे घडले. यावर तेलंगणा सीएमओकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. व्हिडिओमधील कृत्य राष्ट्रीय पक्ष बनवण्याच्या कार्याशी संबंधित नसून ते दसरा उत्सवाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे.

Story img Loader