हिवाळा सुरू होताच अनेक जण हिलस्टेशनवर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान पर्यटकांना बर्फवृष्टी पाहण्यास मिळते. पांढऱ्या शुभ्र बर्फात फिरण्याची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे अनेक जण मित्र- मैत्रिणी किंवा कुटुंबाबरोबर शिमला, जम्मू काश्मीर येथे जाऊन बर्फवृष्टीचा आनंद घेतात. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इथे कडाक्याच्या थंडीत, बर्फात बसून चक्क एक तरुण तबला वाजवताना दिसला आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बर्फाळ प्रदेशात तरुण बसला आहे आणि त्याच्या पुढ्यात तबला आहे. आजूबाजूला सर्वत्र बर्फ पसरला आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात बसून तरुण एका हिंदी गाण्यावर तबल्यावर ठेका धरतो आहे. ‘माहिये जिना सोहना’ या गाण्यावर तरुण तबला अगदी ताला-सुरात वाजवतो आहे; जे ऐकून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल इतकं नक्की…. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.
हेही वाचा…मोफत जेवण, झोपण्याची सोय… मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा ‘हा’ VIDEO पाहून नेटकरी विचारतायत अर्ज कसा करू?
व्हिडीओ नक्की बघा :
‘माहिये जिना सोहना’ हे गाणं संगीतकार दर्शन रावल यांनी गायले आहे, तर तरुणाने हेच गाणं गाऊन न दाखवता तबल्याच्या ठेक्यावर त्याने सादर केलं आहे. तरुणाची ही अप्रतिम कलाकारी पाहून देशातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका हे प्रभावित झाले आहेत आणि त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिलं की, ‘बर्फात वाजवला तबला’; असे त्यांनी इंग्रजीमध्ये कॅप्शन दिले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ हर्ष गोएंका यांच्या या @hvgoenka अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून तरुणाच्या या कलेचे सर्वच नेटकऱ्यांकडून जबरदस्त कौतुक होत आहे आणि सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.