Unique Ad For Math Teacher: एखाद्या कंपनीत नवीन जागा भरायच्या असतील तर त्यासाठी आधी जाहिरात दिली जाते. जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला नोकरीचे पद किंवा त्यांचा संपर्क याबाबत माहिती मिळते. सध्या सोशल मीडियावर अशीच एक जाहिरात प्रचंड व्हायरल होत आहे. जी पाहून तुम्हीही चक्रावून जाल. या जाहिरातीत एक गणिताचा प्रश्न विचारला गेला आहे. तो सोडवल्यावर एक फोन नंबर निघेल आणि नोकरीसाठी त्याच नंबरवर संपर्क करता येईल.
आपण हा प्रश्न सोडवू शकता का?
नोकरीची ही जाहिरात पाहून तुम्हालाही धक्का बसेल. गुजरातमधील एका शाळेने काढलेली ही जाहिरात गणित विषयाच्या शिक्षकासाठी आहे. या जाहिरातीत कोणतीही माहिती नसून एक गणिताचा प्रश्न विचारण्यात आला आहे. तो सोडवल्यावर एक नंबर निघेल. प्रश्न सोडवल्यानंतर मिळालेला नंबर हा त्यांना संपर्क करण्याचा फोन नंबर असेल. नोकरीच्या जाहिरातीची ही अनोखी आयडिया असून गणित या विषयाचा शिक्षक व्हायचं असेल तर हा प्रश्न सोडवता आलाचं पाहिजे. ही जाहिरात पाहून हर्ष गोएंका यांना देखील हसू आवरता आलं नाहीये.
( हे ही वाचा: Video: जंगलात फिरताना दिसला विचित्र प्राणी; लांब सोंड आणि मांजरासारखा आकार पाहून तुम्हीही थक्क व्हाल)
उद्योगपती हर्ष गोएंका यांनी ट्विट केले आहे
हर्ष गोएंका यांनी ट्विटर ही पोस्ट शेअर केली आहे. ही जाहिरात आतापर्यत १० लाखाहून अधिक वेळ पाहिली गेली आहे. तर १४ हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. तसच अनेकजण यावर मजेशीर कंमेंट देखील करत आहेत. एकाने म्हटलंय “हा प्रश्न सोडवण्यास तीन पाने लागतात” तर दुसऱ्याने म्हटलंय ” मला याठिकाणी अर्ज करायला एक वर्ष लागेल” तर अनेकांनी याचे उत्तर सोडवले देखील असून फोन नंबर देखील शेअर केला आहे.