तुम्ही दुरदर्शनच्या काळातील आहात का? असाल तर काळ्या-पांढऱ्या पडद्यावर जाहिरात, मालिका, गाणी आणि चित्रपट पाहिले असतील. तो काळ फार वेगळा होता, नाही का? आता जर तुम्ही त्या काळ्या पांढऱ्या पडद्यावरील व्हिडिओ पाहिले तर तुमच्या दुरदर्शनच्या आठवणी नक्की ताज्या होतील. विशेषत: दुरदर्शनबदल गेला विशेषत: जाहिरातींच्या बाबतीत. काळानुसार जाहिरांतीच्या व्हिज्युअलायजेशन आणि आशय यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. सध्या अशाच एका दुरदर्शनच्या काळातील काळ्या -पांढऱ्या पडद्यावरील जाहिरात सध्या चर्चेत आहे. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एका जुन्या टायरच्या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला आहे जो एकेकाळी प्रेक्षकांना खूप आवडत असे पण आता फार मजेशीर वाटत आहे.
हर्ष गोयंका शेअर केली दुरदर्शनची जाहिरात
RPG Entrepriseच्या अध्यक्षांनी ही व्हिडिओ क्लिप शेअर करताना लिहले, ”काळ, संदर्भ आणि तंत्रज्ञानासह जाहिरात कशा बदलल्या आहेत! #CEAT #Doordarshan”.
या क्लिपमध्ये असे दिसते की, एका पांढऱ्या अॅम्बेसेडर कारमध्ये लोक खचा खच भरले आहेत. गाडी थांबताच कारच्या खिडकीतून दोन व्यक्तींची डोकी बाहेर येताना दिसतात. जवळपास ७ लोक माग दरवाज्यातून उतरतात आणि हे सर्व पाहून थक्क झालेला व्यक्ती उभा राहताना दिसतो आहे. जसे लोक कारमधून बाहेर येतात तसा कॅमरा टायरवर झूम केला आहे. त्याचवेळी बॅकग्राऊंडमधून एक व्यक्तीचा आवाज येतो, पण विश्वास ठेवणे अवघड आहे पण हे सत्य आहे. CEAT नायलॉन टायरसाठी ही एक रोज घडणारी गोष्ट आहे. खडबडीत, विश्वासार्ह, खिशाला परडवणारा, CEAT जन्मतः कठीण”
हेही वाचा – कार चालवायला शिकताय? मग रस्त्यावर गाडी चालवताना ‘या’ नियमांचे करा पालन, जाणून घ्या
टायरची जुनी जाहिरात झाली व्हायरल
व्हिडिओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत १ लाख पेक्षा जास्क लोकांनी पाहिला आहे तर अनेकांच्या प्रतिक्रिया मिळत आहे. एकाने म्हटले, जर आज ही जाहिरात जाहीर केली तर कंपनीलाला दंड भरावा लागेल. तर दुसरा व्यक्ती म्हणाला की, हे मजेशीर आहे.” काही लोकांनी अशी प्रतिक्रिया दिली की ”जाहिरात आहे की मजेशीर व्हिडिओ”
ही जाहिरात पाहून तुम्हाला काय वाटते? दुरदर्शनच्या काळातील तुमच्या आठवणी ताज्या झाल्या का? मग आम्हाला नक्की कळवा