Industrialist Harsh Goenka shares resignation letter: नोकरी हा आपल्या देशातील खूप महत्त्वाचा विषय आहे. जिथे एकीकडे बेरोजगारी वाढत आहे, लोक नोकरीसाठी आपला राग व्यक्त करत आंदोलन करत, नोकऱ्या वाढविण्याची मागणी करत आहे. तर दुसरीकडे काही लोक असे देखील आहेत की ज्यांच्याकडे नोकरी आहे पण तरी त्यांना समाधान ( job Satisfaction) मिळत नाही. सध्या जितकी बेरोजगारी आहे तितकेच कामाचा दबाव देखील आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये बहूतेक लोक नोकरीमध्ये लोकांना समाधान, सुख आणि शांती कमी मिळते. अशा स्थितीमध्ये काही लोक नोकरी सोडणे शहाणपणाचे मानतात. सध्या सोशल मिडीयावर एका व्यक्तीचा व्हायरल राजिनाम्यामध्ये (Resignation Letter) एका व्यक्तीने आपलं दुख व्यक्त केले आहे आणि उद्योगपती हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हे शेअर केले आहे.
एका ओळीचा राजीनामा लिहून सोडली नोकरी
सध्या सोशल मिडियावर एका राजिनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ही पोस्ट इंडस्ट्रयलिस्ट हर्ष गोयंकाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या पत्रामध्ये लिहिले आहे की, ”डिअर सर, मी राजीनामा देतोय, कामात मज्जा येत नाही, तुमचा राजेश”. बास एवढाचं मजकूर लिहून या व्यक्तीने राजीनामा दिला आहे.
हर्ष गोयंका म्हणाले, ”समस्या गंभीर आहे”
सहसा ऑफिसमध्ये मेल द्वारे किंवा लेखीमध्ये नियोजित फॉर्मटनुसार राजीनामा दिला जातो. पण इंटरनेटवर धुमाकुळ घालणारा राजीनामा थेट आणि स्पष्ट शब्दात लिहिला आहे. हा राजीनामा शेअर करताना हर्ष गोयंका यांनी लिहिले की,”पत्र छोटे आहे पण अर्थ खूप गंभीर आहे. ही एक मोठी समस्या आहे ज्यावर उपाय आपल्या सर्वांनी शोधला पाहिजे.” या राजीनाम्याचा स्क्रिनशॉट हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर सह लिंक्डइनवर देखील शेअर केला आहे.
सोशल मीडियावर उद्योगपती हर्ष गोयंका यांनी अशा आश्चर्यकारक पोस्ट शेअर करत असतात. पण कित्येक पोस्टमध्ये त्यांनी मजेशीर असतात ज्या काही क्षणात वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. जसे की त्यांनी राजेश नावाच्या एका व्यक्तीने ऑफिसमध्ये दिलेल्या राजीनाम्याचा फोटो शेअर केला आहे, जो पाहून प्रत्येकजण आश्चर्यचिकत होत आहे.
हेही वाचा – डोळ्यांवर विश्वास बसणार नाही…पायाचा पुढचा पंजा मागे अन् मागची टाच पुढे फिरवतेय ‘ही’ बाई! पाहा फोटो
व्हायरल होत असलेल्या या पोस्टला आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पसंती दिली आहे. या पत्रामध्ये १८ जूनमध्ये लिहिलेली आहे. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटले की, कर्मचारी मुद्द्याच बोलणारा वाटतो आहे तर दुसऱ्याने विचारले, नक्की अडचण काय होती? तर आणखी एक जणाने म्हटले की, राजीनामा देणारा स्पष्ट वक्ता आहे. तर दुसऱ्या यूजरने सांगितले की, ”हा राजीनामा सविस्तर सांगण्याची गरज पडणार नाही. आणखी एकाने म्हटलं की, ”देव असा अॅटीट्यूट सर्वांना देवो.”