सध्या सर्वत्र नाताळची तयारी सुरू आहे. गेली दोन वर्ष लॉकडाउन आणि करोना निर्बंधांमुळे कोणतेच सण मनसोक्त साजरे करता आले नाहीत. त्यामुळे यावर्षी उत्साहात नाताळ साजरा करण्याची तयारी सर्वत्र सुरू आहे. नाताळची सुट्टी, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे प्लॅनिंग, ‘क्रिसमस ट्री’ची सजावट यांसह आणखी एक मुख्य आकर्षण असते ते म्हणजे सांताक्लॉजचे गिफ्ट्स.
सांताक्लॉज आपल्याला काय गिफ्ट देणार याची लहान मुलांची उत्सुकता पाहण्यासारखी असते. लहान मुलांप्रमाणेच मोठी मंडळीही सांताक्लॉजकडे गिफ्ट्सची मागणी करताना दिसतात. अशीच एक मागणी सध्या व्हायरल होत आहे. ही मागणी उद्योगपती हर्ष गोएंका यांनी केली आहे. यावर्षी हर्ष गोएंका यांना सांताक्लॉजकडुन काय हवंय याचा फोटो त्यांनी शेअर केला आहे, पाहा तो फोटो.
आणखी वाचा: Video: स्कूटर पार्क करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच
हर्ष गोएंका यांची पोस्ट:
आणखी वाचा: Video: मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल; दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा
हर्ष गोएंका यांनी ‘मला खूप मोठे (प्रचंड मोठी रक्कम असलेले) बँक अकाउंट आणि पातळ शरीर हवे आहे. यावर्षी तरी या मागणीमध्ये मागच्यावर्षी प्रमाणे फेरबदल करू नये’ अशी मागणी सांताक्लॉजकडे केली आहे. नेटकऱ्यांना ही मगणी पटली असून, त्यांनी पोस्टवर कमेंट करत मागणीला पसंती दर्शवली आहे.