समुद्राचं आकर्षण तसं प्रत्येकाला असतं आणि समुद्राच्या पोटात दडलंय काय? हा प्रश्न पडत असतो. महासागरात अजूनही अनेक रहस्ये आहेत ज्यांची मानवांना कल्पना नाही. सोशल मीडियावर समुद्रात राहणाऱ्या विशाल प्राण्यांचे व्हिडिओ आणि फोटो आपल्याला आश्चर्यचकित करत असतात. त्यातच समुद्रातला सर्वात विशाल जीव म्हणजे (ब्लू व्हेल) देव मासा. ब्लू व्हेल हा जगातील सर्वात मोठा प्राणी असल्याचे तुम्ही ऐकलेच असेल. या ब्लू व्हेल माश्याचे आतापर्यंत तुम्ही अनकवेळा फोटो पाहिले असतील. मात्र आता समोर आलेला फोटो पाहून तुम्ही नक्कीच चकीत व्हाल. आपल्याला अंदाज आहे की ब्लू व्हेल मासा किती विशाल आहे, आता कल्पना करा की एवढ्या मोठ्या प्राण्याचे हृदय किती मोठे असेल. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे.

‘ब्लू व्हेल’ माशाच्या हृदयाचा फोटो समोर –

उद्योगपती हर्ष गोएंका सोशल मीडियावर अनेकदा आश्चर्यकारक फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. नुकताच त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ब्लू व्हेलचे जतन केलेले हृदय दिसत आहे. ब्लू व्हेल माश्याच्या हृदयाचा आकार प्रचंड मोठा असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. हर्ष गोएंका यांनी हा फोटो शेअर करत म्हंटलंय की, हे ब्लू व्हेलचे जतन केलेले हृदय आहे. त्याचे वजन 181 किलो असून ते 4.9 फूट लांब तर 3.9 फूट रुंद आहे. त्याच्या हृदयाचे ठोके 3.2 किलोमीटर अंतरावरून ऐकू येतात. टोरोंटो येथील रॉयल ओंटारियो संग्रहालयात हे ब्लू व्हेल माशाचं हृदय जतन करण्यात आलं आहे.

पाहा ‘ब्लू व्हेल’ माशाचं हृदय –

हेही वाचा – video viral : भर रस्त्यात ऊसानं भरलेल्या ट्रॅक्टरमध्ये चालकाची स्टंटबाजी, अतिशहाणपणा पाहून भडकले यूजर्स

या फोटोला आतापर्यंत दोन हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर फोटो पाहून सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत. अनेकांनी ब्लू व्हेल माशाचं एवढं मोठं हृदय व्यवस्थित जतन करुन ठेवलंय याचं कौतुक केलं आहे.

Story img Loader