Harsh Goenka Shares Stunt Video: इंटरनेटवर स्टंट व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात. काही स्टंट इतके धोकादायक असतात की, स्टंटमॅन मृत्यूच्या दारातून परत येतात. याशिवाय असे देखील व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्यामध्ये स्टंट करताना अनेकांना जीव देखील गमवावा लागतो. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोकं मृत्यूशी देखील खेळताना दिसून येतात. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो पाहून तुमचाही अंगावर काटा येईल.
हर्ष गोएंका यांनी शेअर केला थरकाप उडवणारा Video
आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका हे सोशल मीडियावरील त्यांच्या हटके पोस्ट्ससाठी ओळखले जातात, त्यांच्या फॉलोअर्ससाठी ते अनेकदा मनोरंजक गोष्टी शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लोक चालत्या कारमधून उडी मारून सुरक्षित उतरताना दिसत आहेत. एका स्टंटमध्ये रशियन स्टंटमॅन ‘ह्युमन बुलेट’प्रमाणे कारमधून उडताना दिसला. नद्यांमध्ये गाड्या आदळताना आणि उतरतानाची इतरही दृश्ये आहेत. हर्ष गोएंका यांनी हे स्टंट कोणी केले किंवा ते कधी रेकॉर्ड केले याचा उल्लेख केला नाही.
( हे ही वाचा: ट्रेनच्या अप्पर सीटवरून खाली येण्यासाठी लहान बाळाची ‘निंजा टेक्निक’, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ Video एकदा बघाच)
जबरदस्त स्टंट व्हिडिओ एकदा पाहाच..
( हे ही वाचा: श्रद्धेला सीमा नाही! मंदिरात घंटा वाजवण्यासाठी चक्क कुत्र्याची हजेरी; व्हायरल Video पाहून नेटकरी म्हणतात, ”हा खरा…”)
स्टंट व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या
शेअर केल्यापासून, व्हिडिओला २४,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय अनेकजण यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसच काहीजणांना हे धोकादायक स्टंट करण्यामागचे कारण समजले नसल्याचे त्यांनी म्हटलंय. एका यूजरने या व्हिडिओला प्रतिक्रिया देत म्हटलंय की, ” यामुळे महिला अधिक काळ जगतात”. तर दुसऱ्याने ‘ब्रिलियंट’ अशी कमेंट केली.