महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद्र महिंद्रा यांच्याप्रमाणे उद्योगपती हर्ष गोयंकादेखील ट्विटर आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय असतात. देसी जुगाडसह ते आयुष्याशी निगडित अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी शेअर करत असतात. यात आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी त्यांच्या हँडलवरून मैत्रीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून तुम्हीही म्हणाल, सर, तुमचे मत एकदम बरोबर आहे. त्यांचे हे ट्वीट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
उद्योगपती हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या पोस्टमधील फोटो तुम्ही पाहू शकता, ज्यात तुम्हाला द्राक्षांचे दोन घड दिसतील. एका घडात अनेक द्राक्षे आहेत. ज्याच्या पुढे लिहिले आहे की, माझे मित्र जेव्हा मी १५ वर्षांचा होतो. तर दुसऱ्या द्राक्षांच्या घडात फक्त दोनच द्राक्षे आहेत. त्याच्या पुढे लिहिले आहे की, आता माझे मित्र.
एकंदरीत या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपले खूप मित्र असतात, पण जेव्हा आपण म्हातारे होत जातो तेव्हा आपले मित्र फक्त दोन ते तीन असतात.
‘खूप मित्रांची गरज नाही…’
हर्ष गोएंका यांनी २३ मे रोजी ट्विटरवर हा फोटो पोस्ट करत लिहिले की, मला जाणवले आहे की, जसजसा मी वयस्क होत आहे मला जास्त मित्रांची गरज वाटत नाही. माझ्यासोबत आता जे काही माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी आनंदी आहे. हर्ष गोएंका यांच्या या ट्वीटला दहा हजारांहून अधिक व्ह्यूज आणि तीनशेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांना ट्वीटमधील त्यांचे मत पटलेले आहे. यावर एका युजरने लिहिले की – थोडे मित्र असावेत, परंतु चांगले आणि खरे असावेत. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, गर्दी नको… फक्त मित्र हवेत. इतकेच नाही तर आणखी एका युजरने मिष्कीलपणे लिहिले की, द्राक्षे आंबट आहेत. हर्ष गोएंका यांनी मैत्रीबाबत शेअर केलेले हे मत अनेकांना पटले आहे. पण या ट्वीटनंतर तुम्हाला काय वाटते, आयुष्यात किती मित्र असावेत? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.