हार्वर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी प्रतीक कंवल याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र व्हायरल होत आहे, उत्तर प्रदेश येथील एका रॅलीमध्ये मोदींनी हार्वर्डवर एक टिप्पणी केली होती आणि त्यावर या मुलाने उत्तर देत एक पत्र लिहिले आहे.
उत्तर प्रदेश येथील रॅलीमध्ये मोदींनी “हार्वर्डपेक्षाही जास्त दम हार्ड वर्क मध्ये आहे’ अशी टिप्पणी केली होती. याच विद्यापीठात शिकत असलेल्या प्रतीक कंवल याने मोदींना उत्तर देत पत्र लिहिले आहे. ‘जगातल्या प्रतिष्ठीत विद्यापीठाची अशी टेर उडवल्याने भारत जगात वेगळा पडेल, यामुळे देशाचे नुकसान होईल. या देशाला वेगळा दृष्टीकोन असलेल्या लोकांची गरज आहेत आणि भारतातले अनेक विद्यार्थी इथे येऊन शिक्षण घेत आहेत, अशा टिका करून ते इथल्या विद्यार्थ्यांना भारतभूमीपासून दूर लोटत आहेत असे त्याने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सरकारच्या अनेक महत्त्वाच्या पदावर याच विद्यापीठातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी कार्यरत आहे असा दावाही त्याने आपल्या पत्रातून केला आहे. एकीकडे मोदी या विद्यापीठावर टिका करत आहेत तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मात्र या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना सरकारशी सहकार्य करण्याचे आवाहान करतात, पण मोदींच्या अशा टिकेमुळे हेच विद्यार्थी दूर जातील असेही त्याने पत्रात म्हटले आहे.  उत्तर प्रदेश निवडणुकांच्या प्रचार सभेत मोदींनी “हार्वर्डपेक्षाही जास्त दम हार्ड वर्क’ मध्ये आहे अशी टीका केली होती, खरं तर त्यांचा रोख हा अर्थतज्ञ्ज अमर्त्य सेन यांच्याकडे होता. आजकाल निर्णय हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेत नसून मोदी घेतात असा टोला त्यांनी लागावला होता.