Haryana Election Result 2024: हरियाणात भाजप की काँग्रेस? सोशल मीडियावर ‘या’ पक्षाच्या विजयाचा दावा, काय म्हणतायत लोक, वाचा

Haryan Election Result 2024 : हरियाणा निवडणुक निकालाबाबत सोशल मीडियावर नेमका कोणत्या पक्षाला पाठिंबा मिळत आहे जाणन घेऊ…

haryana election 2024 memes
हरियाणा निवडणुक निकाल २०२४ मीम्स (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Haryana Election 2024 Rusult Memes : हरियाणामध्ये ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज म्हणजेच मंगळवारी जाहीर होणार आहेत. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीतील आकडेवारीचा ट्रेंड पाहता, यात काँग्रेस प्रतिस्पर्धी भाजपापेक्षा पुढे आहेत. टीव्हीवर येत असलेल्या काही बातम्यांमध्येही सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसने विधानसभेच्या ९० जागांपैकी ४५ जागांवर बहुमताचा आकडा पार केला आहे. हे सुरुवातीचा कल असून, मतमोजणीनंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. पण, सोशल मीडियावर युजर्स एका पक्षाच्या विजयाची घोषणा करीत आहेत. युजर्स नेमके कोणत्या पक्षाला पाठिंबा देत आहेत ते जाणून घेऊ…

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी कुरुक्षेत्र जिल्ह्यातील लाडवा मतदारसंघातून आघाडीवर आहेत; तर काँग्रेस नेते भूपेंद्र सिंग हुडा हे रोहतक जिल्ह्यातील गढी सांपला-किलोई मतदारसंघातून त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आघाडीवर आहेत.

मात्र, निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार हरियाणाचे माजी मुख्यमंत्री हुड्डा ५,०८२ मतांनी पुढे आहेत. तर, भाजपा नेते अनिल विज त्यांच्या अंबाला कँट मतदारसंघात आघाडीवर आहेत. त्यानंतर इंडियन नॅशनल लोकदलाचे (INLD) नेते अभय सिंह त्यांच्या चौटाला एलेनाबाद मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांचा मुलगा आदित्य सुरजेवाला हे कैथल जागेवर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा पुढे आहेत. हरियाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांचा मुलगा आदित्य सुरजेवाला हे कैथल जागेवर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा पुढे आहेत. हरियाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर काही लोक काँग्रेसच्या विजयाचा दावा करीत आहेत. पण, शेवटी भाजपाचाच विजय होईल, असे काहींचे मत आहे. भाजपा आणि काँग्रेसच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाडला जात आहे. सोशल मीडियावर युजर्स नेमके काय म्हणत आहेत ते जाणून घेऊ…

राहुल गांधींच्या उदयाचा काळ

एका युजरने लिहिले आहे की, मोदीजींनी जिलेबी खावी, मी त्यांना पाठवत आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, राहुल कोण आहे हे विचारण्याची आता वेळ नाही. आता राहुल गांधींच्या उदयाचे युग आहे. ही व्यक्ती २०२९ मध्ये देशाचा पंतप्रधान होणार आहे. आणखी एका युजरने राहुल गांधींची खिल्ली उडवीत म्हटले की, हळूहळू मीही ईव्हीएम हॅक करायला शिकलो आहे.

एक युजर म्हणाला की, जम्मू-काश्मीरमध्येही भाजपाची स्थिती चांगली नाही. ओमर अब्दुल्ला हे दोन्ही जागांवर पुढे आहेत. काश्मीर विधानसभा निवडणुकीतही भाजपचा पराभव होतोय. इथेही मोदींच्या आवडत्या मुस्लिमांनी मतदान केले नाही? अर्थ स्पष्ट आहे… हरियाणा आणि जम्मू-काश्मीर दोन्ही हातातून गेले.

फक्त आम्हीच जिंकू – भाजप समर्थकांचा दावा

एका युजरने लिहिलेय की, काँग्रेसकडे ट्रेंड येऊ लागला आहे. वेळ ही सर्वांत मोठी शक्ती आहे. भाजपाच्या एका समर्थकाचा असा दावा आहे की, हा सर्वांत सुरुवातीचा कल आहे. जेव्हा निकाल येतील, तेव्हा आम्ही जिंकू. तर एकाने दावा केला आहे की, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा सुपडा साफ होणार आहे.

तर काहींनी लिहिले आहे की, तुम्हाला ईव्हीएम हॅकची सबब बनवावी लागणार नाही. इतर काहींनी म्हटले आहे की, आताचा नवा ट्रेंड पाहा. हरियाणातील जनतेने भाजपाचा माज उतरवला आणि आता उत्तर प्रदेशातील लोकांनीही त्यांचा माज उतरवला आहे.

मोदी मॅजिकचा प्रभाव शेवटच्या टप्प्यावर

एका युजरने मीम शेअर करीत म्हटले की, उद्या हरियाणातून कट्टपाच्या वेळी शंख वाजवा, द्वेषाचं दुकान बंद होणार आहे. प्रेमाचं सरकार येतंय…! दुसऱ्याने लिहिले, मोदीजींच्या जादूचा प्रभाव आता शेवटच्या टप्प्यावर आहे. आता संघाशिवाय भाजपा टिकू शकत नाही, हे मान्य करायला हवे.

प्रेमाचे दुकान होणार बंद

आणखी एका युजरने दावा केला की, आता प्रेमाचे दुकान बंद होणार आहे. माझा मूड बिघडला होता; पण आता माझे हळूहळू ठीक होत आहे. हरियाणा असो वा जम्मू-काश्मीर, मुस्लिमांनी भाजपाला मतदान केलेले नाही, हे अगदी स्पष्ट आहे. एकाने लिहिले, शेतकऱ्यांनी आज आपली ताकद दाखवून दिली आहे. गर्विष्ठ लोकांनी आता त्यांचा बोजा-बिस्तरा गुंडाळावा. एक युजर म्हणतोय की, भाजपा हरला, तर मीडिया नड्डा यांचा चेहरा पुढे करतो आणि जिंकला, तर मोदी लाटेबद्दल सांगतो. एकाने म्हटले आहे की, हरियाणातील लोकांना जिलेबी कमी पडली, तर त्यांनी ती यूपीमधून आणावी.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Haryan vidhan sabha election result 2024 congress will win bjp defeat people reaction viral on social media rahul gandhi pm narendra modi amit shah bhupendra singh hudda viral memes sjr

First published on: 08-10-2024 at 14:36 IST
Show comments