Dog Dies Inside The Car : घराचा दरवाजा बंद केल्याने कुत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना सहा महिन्यांपूर्वी पंजाबच्या अमृतसर येथे घडली होती. अशाच प्रकारची धक्कादायक घटना पुन्हा एकदा घडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हरयाणातील चार जण ताजमहल पाहण्यासाठी आग्रा येथे आले होते. ताजमहल पाहण्याचं त्या व्यक्तींचं स्वप्न पूर्ण झालं. पण त्यांच्यासोबत असलेल्या पाळीव कुत्र्याला मात्र जीव गमवावा लागला. कारण कारमध्ये कुत्रा असतानाही त्या व्यक्तींनी दरवाजा बंद केला. कारच्या खिडक्या आणि दरवाजा बंद असल्याने कुत्र्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. पार्किंगमध्ये असेलेल्या कारचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. आग्रा पोलिसांनी ट्वीटरवर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संबंधीत व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. दरम्यान, पोलिसांनी कार जप्त केली असून हरयाणा येथूल आलेल्या पर्यटकावर प्राण्यांच्या क्रुरतेबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा – Optical Illusion IQ Test: झाडावर बसलेत सुंदर पक्षी, पण किती? १० सेकंदात सांगा अचूक उत्तर

इथे पाहा व्हिडीओ

कारमध्ये कुत्र्याचा मृत्यू श्वास घेण्याच्या समस्येमुळे झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्याची गळ्यातील साखळी हॅंडब्रेकला अडकल्याने गळ्याला फास बसला आणि कुत्र्याचा मृत्यू झाला. कुत्र्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण माहित होणार आहे. हरयाणातील चार जण ताजमहल पाहण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत पाळीव कुत्रा होता. ताजमहल पाहण्यासाठी हे सर्व निघून गेले. पण कारचा दरवाजा बंद केल्याने कुत्रा आतमध्येच राहिला आणि दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पार्किंगमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने माध्यमांशी बोलताना दिली.