आपल्या लोकप्रतिनिधीला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोक नेहमीच उत्साही असतात. अनेक नेता आपल्या समर्थक किंवा चाहत्यांना निराश करत नाही. मात्र, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सेल्फी काढायला आलेल्या समर्थकला धुडकावून लावलं आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सोल्फी काढायला आलेल्या चाहत्याला त्यांनी धुडकावून लावल्याचे दिसतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा सर्व प्रकार एका कार्यक्रमातील आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहचले होते. सर्वजण त्यांचं स्वागत करत होते. त्याचवेळी एका तरूण त्यांच्या पाया पडला आणि सेल्फी काढण्यासाठी सरसावला. मनोहर खट्टर यांनी त्या तरूणाला धुडकावून लावले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या लोकांनी त्याला आरामात बाजूला केलं.

याआधीही फेब्रुवारीमध्ये खट्टर यांनी वृद्ध दांपत्ती यांना चुकीची वागणूक दिली होती. त्यांच्यावर लोकांमध्ये चिडले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana cm manoharlal khattar pushes aside man who came to take selfie with him nck