Haryana Election 2024 Congress Trolls BJP Narendra Modi Amit Shah : हरियाणा विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या पाच ऑक्टोबर रोजी राज्यात मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. राज्यात भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व आम आदमी पार्टीसह सर्वच प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार चालू आहे. प्रचारादरम्यान, सर्व पक्ष व उमेदवार एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही पक्ष यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करताना दिसत आहेत. अशातच काँग्रेसने एक अ‍ॅनिमिटेड व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चिमटा काढला आहे.

या व्हिडीओमध्ये काँग्रेसने नरेंद्र मोदी अमित शाह यांना मुन्नाभाई व सर्किटच्या (मुन्नाभाई एमबीबीएस व लगे रहो मुन्नाभाई चित्रटातील दोन प्रमुख पात्र) अवतार पाहायला मिळत आहे. मोदी मुन्नाभाई तर शाह सर्किटच्या अवतारात एकमेकांशी बोलत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. यामध्ये मुन्नाभाई सर्किटला म्हणतो, “आपण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश हे राज्य गमावलं आहे. आता हरियाणा देखील आपल्या हातून निसटत चाललं आहे”. यावर सर्किट त्याच्या परीने मुन्नाभाईला वेगवेगळे पर्याय सुचवतो, जे मुन्नाभाई नाकारतो. अखेर तो म्हणतो की “मी मतांचं ध्रुवीकरण कसं करता येईल ते पाहतो, जेणेकरून आपला पक्ष ही निवडणूक जिंकेल”.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे ही वाचा >> भरवर्गात माकडाची एन्ट्री! विद्यार्थीनीला मारली मिठी, केस पकडले अन्…; पाहा खट्याळ VIDEO

मुन्नाभाई व सर्किटमधील संवाद

मुन्नाभाई : अरे सर्किट मला हरियाणा निवडणुकीची खूप चिंता वाटू लागली आहे.
सर्किट : मोटाभाई! माझ्याकडे प्रत्येक आजारावरील औषध आहे.
मुन्नाभाई : अरे सर्किट तू गप्प बस, आपण उत्तर प्रदेशात खूप वाईट पद्धतीने हरलो, आता हरियाणासारखं राज्य आपल्या हातून निसटतंय.
सर्किट : उत्तर प्रदेशात आपण योगीमुळे हरलो.
मुन्नाभाई : अरे हरियाणात गेली १० वर्षे खट्टरने खूप खाल्लं, मलाही दिलं. ते कसं लपवायचं त्याची चिंता वाटतेय.
सर्किट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नव्या लोकांची यादी आली आहे. त्यातील काही लोकांना निवडणुकीला उभं करू
मुन्नाभाई : आरएसएसचे लोक नको! इथे मी बिग बॉस आहे. शेतकऱ्यांनी आपल्या विजयाच्या वाटेत खिळे ठोकले आहेत. त्यांचं काहीतरी करायला हवं.
सर्किट : शेतकऱ्यांना एखादं लॉलीपॉप देऊया.

हे ही वाचा >> मुंबईतील ‘या’ भागातील घराचे महिन्याचे भाडे ऐकून तुम्हालाही फुटेल घाम! टॉयलेट सीटच्यावर बसवलीय वॉशिंग मशीन अन्…; पाहा PHOTO

मुन्नाभाई : अरे मग त्या अग्नीविरांचं, पैलवानांचं काय करायचं?
सर्किट : त्यांचं टेन्शन कशाला घेता, एक-दोन फटके दिल्यावर ते सरळ होतील.
मुन्नाभाई : अरे प्रत्येक वेळी मारण्याच्या गोष्टी करू नको. काठी सोडून इतर गोष्टींचा विचार कर. आपण हैदराबाद हे शहर गमावलं आहे. पाठोपाठ बंगळुरू देखील गमावलं. आता मला असं वाटतंय की गुरुग्राम देखील आपल्या हातून निसटतंय.
सर्किट : मी एक काम करतो. मी मतांचं ध्रुवीकरण कसं करता येईल ते पाहतो.

Story img Loader