आपला देशसुध्दा विचित्र आहे. एकीकडे लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा अशा देवींची शेकडो रूपांमध्ये पूजा केली जाते. आणि दुसरीकडे आपल्या आसपासच्या महिलांकडे वाईट नजरेने पाहिलं जातं. बलात्काराच्या घटनांमध्ये त्या स्त्रीलाच दोषी मानलं जातं. तिच्या चारित्र्याचे आणि तिच्या कुटुंबीयांचे वाभाडे काढले जातात. बलात्कार करणारा उजळ माथ्याने वावरतो आणि त्या महिलेला मात्र हीन दर्जाची वागणूक दिली जाते. तिचं लग्न होत नाही आणि तिच्या आयुष्याचं वाताहात होत जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पण एका बलात्कारपीडित महिलेला आपल्या जीवनाची जोडीदार म्हणून निवडणाऱ्या जितेंदर छत्तरच्या मनात हे विचार आलेही नाहीत. सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या आपल्या बायकोच्या गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणण्याच्या लढाईत तो तिची साथही देतोय.

आणि हे सगळं घडतंय हरियाणासारख्या राज्यात!!

‘दंगल’ सिनेमामुळे आपल्यासमोर नव्याने आलेल्या हरियाणा राज्यामधली पुरूषी मानसिकता आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. या महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांनी तिला नंतर धाकधपटशा दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तिला पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रचंड दादगिरी केली. तिच्या कुटुंबीयांना त्रास दिला.

या महिलेशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर जितेंदर छत्तरने फक्त त्याच्या मनातल्या प्रेमाच्या भावनांना प्राधान्य दिलं. त्यांचं लग्न झाल्यावर जितेंदरच्या बायकोवर अत्याचार करणाऱ्यांनी त्यालाही त्रास देणं सुरू केलं. त्यालाही धमक्या आल्या. पण त्याने आपल्या पत्नीसोबत या नराधमांना कायदेशीर मार्गाने तुरूंगात पाठवायचा लढा सुरूच ठेवला.

वाचा- Valentine’s day 2017: युध्दात फुललेला ‘व्हॅलेंटाईन डे’!!

“कोर्टाची तारीख असली की आमच्या वकिलांशी बोलतानाच आम्ही या सगळ्या गोष्टींची चर्चा करतो” जितेंदर म्हणाला “बाकी रोजच्या जीवनात आम्ही हा विषय काढतही नाही”.

कायदेशीर प्रक्रिया खूपच लांबलचक आणि त्रासदायक असते. या प्रक्रियेदरम्यान साहजिकच अनेकदा जितेंदरच्या पत्नीला नैराश्याची भावना येते. त्यावेळी एक पती आणि एक मित्र म्हणून त्याची भूमिका खूप महत्त्वाची ठरते.जितेंदरच्या प्रोत्साहनामुळे आणि मानसिक आधारामुळे त्याच्या पत्नीने आता कायद्याच्या पदवीचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली आहे.

कोणत्याही लग्नामध्ये आपल्या जोडीदाराला आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगात साथ देण्याची गरज असते. बलात्कारपीडित महिलेला बाकी कशाचा विचार न करता आपल्या मनातल्या प्रेमाच्या भावनेने आयुष्याचा जोडीदार बनवणाऱ्या आणि तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक लढ्यात तिची साथ देणाऱ्या जितेंदर छत्तरला सलाम!