कोणतीही कंपनी आणि तिथे काम करणारे कर्मचारी यांच एक अतुट नातं असते. कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच कोणतीही कंपनी मोठी होते आणि कंपनीच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांची प्रगती होते. पण अनेकदा असे दिसते की, कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या वागणूकीमुळे कर्मचारी नाराज असतात. अनेक वर्ष काम करूनही कित्येक कर्मचाऱ्यांना अपेक्षित पगार मिळत नाही, मेहनती आणि प्रमाणिकपणाची कदर केली जात नाही अशी अनेक कर्मचाऱ्यांची तक्रार असते. पण सध्या एका अशा कंपनीची सर्वत्र चर्चा होत आहे जे आपल्या कर्मचाऱ्यांची खूप चांगल्याप्रकारे काळजी घेत आहेत. एवढंच नव्हे तर या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चक्क कार दिली आहे. तुम्हालाही हे ऐकून धक्का बसला असेल पण हे खरचं घडले आहे. आता तुम्ही म्हणाल अशी कोणती कंपनी आहे जी कर्मचाऱ्यांना कार भेट देते? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ या…
पंचकुलातील एका फार्मास्युटिकल कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मेहनत आणि प्रामाणिकपणासाठी १२ कार भेट दिल्या आहेत. मिट्स हेल्थकेअर या फार्मा कंपनीच्या मालकाने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना टाटा पंच कार भेट दिली आहे.
हेही वाचा – ऐकाव ते नवलचं! फक्त चार फुट जागेत उभारली तीन मजली इमारत; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही
ही भेट पाहून कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही दिवाळी भेट मिळवणाऱ्यांमध्ये एका ऑफिस बॉयचाही समावेश होता. विशेष म्हणजे गाड्या मिळालेल्या काही कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कार चालवता येत नाही तरीही ही त्यांच्या मेहनत आणि प्रमाणिकपणासाठी ही भेट दिली आहे. येत्या काळात आणखी ३८ कर्मचाऱ्यांना कार भेट देण्याची योजना आखली आहे.
हेही वाचा – एका भारतीय व्यक्तीच्या पत्रामुळे इंग्रजांनी रेल्वेमध्ये बनवले टॉयलेट; काय लिहिले होते या पत्रात? जाणून घ्या
कर्मचाऱ्यांना दिलेल वचन पाळलं
मिट्स हेल्थकेअर कंपनीचे मालक एमके भाटिया सांगतात की, “मी माझ्या कर्मचाऱ्यांना ‘सेलिब्रिटी’ म्हणतो. कित्येक वर्षांची मेहनत आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे ही कंपनी उभारली आहे. आज त्यांच्यामुळे ही कंपनी एका यश मिळवत आहे. त्यांनी आपल्या कर्माऱ्यांना काही दिवसांपूर्वी वचन दिले होते की, ते कर्मचाऱ्यांना कार भेट देतील. अखेर त्यांनी हे वचन पूर्ण केले.”