आजकाल खवय्यांचा हॉटेलमधून जेवण ऑर्डर करून आपली खव्वयेगिरी पुर्ण करण्याचा कल जास्त आहे. त्यामुळे आता उठसूठ आता सारेच आपली भूक भागवण्यासाठी जेवण ऑर्डर करतात. स्विगी, झोमॅटो या सांरख्या खवय्यांना सुविधा मिळाल्याने हा कल जास्तच वाढत गेला. त्यात बेत बिर्याणीचा असेल तर खवय्ये मन भरून खात असतात. मात्र तुम्हाला जर कळालं की, आपण जी बिर्याणी खातोय ती गटारातील पाण्याचा वापर करून बनवण्यात आली आहे तर नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.असाच काहिसा धक्कादायक प्रकार हरियाणात घडल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला.
काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडियावर हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होऊ लागला आहे, ज्यात काही लोक हॉटेलच्या मालकाला चोप देताना दिसून येत आहे. या व्हिडिओनूसार या हॉटेलचं नाव शमा बिर्यानी हॉटेल असल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडिओ कलका रोड,पिंजोर, हरियाणातील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की, या हॉटेलमध्ये जी बिर्याणी बनवली जाते ती, गटारातील पाण्याने बनवली जाते. कारण ज्या पाईपने पाणी भरलं जातं ते थेट गटारातून येत असल्याचे दिसून येत आहे. हे लोकांसमोर येताच संतप्त लोकांनी बिर्यानी हॉटेलच्या मालकाला चोप दिला आहे.
तपास –
अल्ट न्यूज या फॅक्ट चेक वेबसाईटने सत्य तपासल्यानंतर असे लक्षात आले की, व्हायरल दावे खोटे आहेत, भोजनालय गटारीतील पाण्याचा रस्त्यावर उपसा करीत होते. गटारामधील हिरवी पाईप, जिथून कथितपणे बिर्याणीसाठी जॉईंटने पाणी काढले होते, ती भोजनालयाच्या स्वयंपाक किंवा साफसफाईच्या ठिकाणी जात नाही, तर जवळच्या रस्त्याकडे जाते, ज्यामुळे शंका निर्माण झाली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: बर्फात स्केटिंग करताना हिमनदीत अडकला तरुण, तळाशी जाऊन ओरडत राहीला पण…
निष्कर्ष – रस्त्याच्या कडेला असलेले बिर्याणीचे दुकान स्वयंपाक आणि साफसफाईसाठी गटाराचे पाणी वापरत असल्याच्या दावा सिद्ध झालेला नाही. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले.