आपल्या मुलाला सरकारी नोकरी मिळावी हे स्वप्न प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक तरुण वर्षांनुवर्ष सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असते. कोणी स्पर्धा परिक्षेची तयारी करते तर कोणी पोलिस भरती परिक्षेची तयारी करते. अनेक तरुणांची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असते ज्यांना दोन वेळचं जेवण देखील मिळत नाही अशा वेळी त्यांच्याकडे महागडे शूज किंवा इतर गरजेच्या वस्तू घेण्यासाठी देखील पैसे नसतात. अशा परिस्थितीमध्ये जर कोणी मदतीचा हात पुढे केला तर त्यांच्यासाठी असा व्यक्ती देवमाणूसच ठरतो. असाच एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवाराची एका पोलिस कर्मचाऱ्याने मदत केली आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी पोलिस अधिकाऱ्याचे भरभरून कौतूक केले आहे. काय आहे हा व्हिडीओ जाणून घेऊ या…
पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवाराला उत्तम शारीरीक क्षमता आणि माफक शिक्षण या दोन गोष्ट आवश्यक असतात. १८ वर्ष वयोगटातील युवकांना कायम स्वरुपी शासकीय रोजगार मिळवण्याचा एक चांगला मार्ग आहे. राज्य पोलीस शिपाई पदासाठी विद्यार्थ्यांना २०० गुणांच्या लेखी चाचणीला सामोरे जावे लागते. त्यात १०० गुण मदानी चाचणीसाठी तर १०० गुण लेखी चाचणीसाठी असतात. मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना धावणे , गोळाफेक, लांब उडी या गोष्टींसाठी परिक्षा द्यावी लागते. अशाच एका धावण्याच्या चाचणी दरम्यान एका गरजू भरती उमेदवारा पोलिस अधिकाऱ्याने मदतीचा हात दिला आहे. सिंथेटिक टॅकवर धावताना पायांना त्रास होतो म्हणून या पोलिस अधिकाऱ्याने एका उमेदावाराला स्वत:च्या पायातील शूज काढून दिले आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या मनाचा मोठेपणाने लाखो नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. अनेकांनी पोलिस अधिकाऱ्याच्या या छोट्या कृतीचे कौतूक केले आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर अश्वमेध करिअर अकॅडमीच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट केल्यापासून तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ५१५९३३ लोकांनी पसंती दर्शवली आहे. अनेकांनी कमेटं केल्या आहेत.
एकाने व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले की, गरीब घरातून मेहनतीच्या जोरावर झालेला अधिकारी असणार म्हणूनच त्याला जाणीव आहे.”
व्हिडीओ पाहून दुसऱ्याने त्याचा अनुभव सांगितला, “पोलिस अधिकारी कर्मचारी चांगले आहेत त्यांना सुद्धा मुलांचे झालेल हाल पाहवत नाही. अक्कल शून्य असणारे तीन डोक्याचे सरकार निर्लज्ज झाले आहे. मी कालच अलिबाग जि. रायगडला गेलो होतो भरतीला रस्त्यावर पावसाने थोडेसे, पाणी कचरा आला होता मुलांच्याच पायाला काड्या काटे टोचू नये म्हणून SP साहेबांनी स्वतः पावसात छत्री घेऊन पूर्ण फिरून झाडायला सांगितले. सलाम आहे रायगड पोलिसांना आणि त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना”
हेही वाचा – ‘वडा पाव गर्ल’च्या चाहत्याने हातावर कोरला तिचा टॅटू, नेटकऱ्यांनी केले ट्रोल, पाहा Viral Video
तिसरा म्हणाला, “असे लोक भेटत नाही या समाजात”
“देवमाणूस, त्या मुलाला तुमच्या रूपात पांडुरंग भेटला आहे. त्याच्याबरोबर तुमच्यापण सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ द्या ही पांडुरंग चरणी प्रार्थना.”