डोसा आणि इडली हे भारतीय पदार्थांमध्ये सर्वाधिक मागणी असलेले पदार्थ आहेत. जवळपास प्रत्येक भारतीय रेस्टॉरंटमध्ये हे दक्षिण भारतीय पदार्थ आपल्याला मिळतात. डोसाचा आस्वाद घेताना आपल्याला तो आपल्या हाताने खायला आवडतो. डोसा हे नाव ऐकताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. डोसा खायला एवढी मजा येते की कोणीही डोसा समोर असला की तो खाल्याशिवाय राहुच शकत नाही. डोसा खायला आवडत नसेल असा क्वचितच कोणीतरी असेल. पण, डोसा खाण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. काहींना काटा आणि चमच्यासहयाने डोसा खायला आवडतो, तर काहीजण हाताने रोटीसारखा डोसा खायला आवडतो. पण डोसा खाण्याची योग्य पद्धत कोणती? हे आता तुम्हाला फूड ब्लॉगर सांगेल. ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये फूड ब्लॉगरने डोसा खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. पण, लोकांना त्यांची ही पद्धत आवडली नसावी आणि डोसा खाण्याची ही पद्धत पाहून लोक आश्चर्यचकित होतात. फूड स्टायलिस्ट आणि ब्लॉगर, मानसी शिव राठीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइल @pizzandpie वर एक व्हिडीओ अपलोड केला आहे, जो डोसा खाण्याची योग्य पद्धत सांगत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की टेबलवर डोस्याची प्लेट आणले आहे. यानंतर, ब्लॉगर्स डोसाच्या वरच्या थराला काट्याच्या चमचाच्या साहाय्याने मधून गोल आकारात कापत आणि तो तुकडा वेगळा काढते. नंतर वेगळा काढलेला तुकडा डोस्याचा मसाला घेऊन ते सांबार आणि चटणीमध्ये बुडवून खातात. जसे आपण घरी भाजी आणि आमटी सोबत रोटी/ चपाती खातो.

या व्हिडीओला आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ब्लॉगरचा डोसा खाण्याचा हा प्रकार वापरकर्त्यांना फारसा आवडला नाही. ही पद्धत पाहून काही लोकं संतापले आहेत, त्यामुळे ही डोसा खाण्याची योग्य पद्धत होऊ शकत नाही. अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर हा डोसा रोटीसारखा कसा खाऊ शकतो? त्याचबरोबर काहींना डोसा खाण्याची ही पद्धत आवडली आणि ती सोपीही वाटली. तसेच हा व्हिडीओ ४७४ हजारापेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

Story img Loader