कॉफी ही पेय अनेकांचे आवडते आहे. कित्येकजणांच्या दिवसाची सुरुवात कॉफीनेच होते. एक कॉफी प्यायले की अगदी ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. थकवा दुर करून काम करण्याची उर्जा कॉफीमधून मिळते. कॉफीचे योग्य प्रमाणात सेवन करणेही तितकेच आवश्यक आहे. अतिप्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तुम्हालाही जर कॉफी प्यायला आवडत असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक हटके कॉफी घेऊन आलो आहोत. कॉफी बनवण्याचे तसे विविध प्रकार आहे पण तुम्ही कधी कुकरवाली कॉफी प्यायली आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला कुकरच्या मदतीने तयार केलेल्या कॉफीबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या…

सध्या कुकरवाली कॉफीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमधील कॉफी गॅसवर नव्हे तर चक्क कुकरच्या वाफेवर बनवलेली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक कॉफी विक्रेता सायकलवर कॉफी विकताना दिसत आहे. त्याच्यासायकलवर जुगाड करून कुकर ठेवलेला दिसत आहे जो तारेने बांधलेला आहे. सायकलला एक बादली आणि एक दुधाची किटली अडकवलेली दिसत आहे. सायकलच्या हँडलला एक पिशवी आहे त्यात काही सामान ठेवलेले दिसत आहे. कॉफी विक्रेता किटलीमधून दुध एका स्टिलच्या मगामध्ये ओततो आणि काही वेळ तो मग बादलीमध्ये ठेवतो. मगातील दुधामध्ये कॉफी साखर टाकतो. त्यानंतर विक्रेता एक वॉल फिरवतो आणि त्यानंतरकुकरच्या शीटीच्या येथे बसवलेल्या एका पाईपमधून त्यातून वाफ बाहेर येते. ती वाफ त्या कॉफीच्या मगामध्ये सोडतो ज्यामुळे ती कॉफी गरम होते. त्यानंतर गरमा गरम कॉफी तीन कपमध्ये ओततो. गरमा गरम कुकरवाली कॉफी तयार आहे.

elephants proposed to their partner with Flowers
सोंडेत धरली फूले अन्… हत्तीने त्यांच्या पार्टनरला केले असे प्रपोज; पाहा व्हायरल VIDEO
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी…
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
Travel vlogger Drew Binsky stranded in traffic for 19 hours
Mahakumbh : कुंभमेळ्यात सहभागी होण्याचं स्वप्न राहिलं अधूरं! १९ तास वाहतूक कोंडीत अडकला ट्रॅव्हल व्लॉगर; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
Mother stole roti chapati for her kids emotional video viral on social media
शेवटी आईचं काळीज! लेकरांसाठी तिने सर्व मर्यादा ओलांडल्या, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
mahakumbha mela 2025 girl towel viral video
महाकुंभमेळ्यात तरुणीने ओलांडल्या सर्व मर्यादा, टॉवेल गुंडाळला अन्…; VIDEO पाहून भडकले लोक
Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
UGC NET 2024 How To Download Answer Key 2024
UGC NET 2024 : युजीसी नेट परीक्षेची ‘उत्तरसुची’ जाहीर! कशी कराल डाउनलोड? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
budget 2025 memes middle class thanks finance minister nirmala sitaraman
Budget 2025 Memes : “१२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही” अर्थसंकल्पातील घोषणेनंतर मध्यवर्गीयांमध्ये आनंदी आनंद; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

हेही वाचा – चंद्रा गाण्यावर तरुणीने केला भन्नाट गरबा; व्हायरल डान्स व्हिडिओ एकदा पाहाच!

हेही वाचा – अजगराच्या विळख्यात अडकले होते हरीण, तेवढ्यात असं काही घडलं अन् वाचला त्याचा जीव; पाहा थरारक व्हिडीओ
इंस्टाग्रामवर thegreatindianfoodie नावाच्या अकांउटवर या कुकरवाल्या कॉफीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही कधी कुकरलवाली कॉफी प्यायली आहे का?” सोशल मीडियावर या कुकरवाल्या कॉफीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान लोकांना ही हटके कॉफी फार आवडली आहे. कॉफी विक्रेत्याचा जुगाड पाहून लोक थक्क झाले आहेत अनेकजण कॉफी विक्रेत्याच्या जुगाडचे कौतूक करत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकाने कमेंट केली की, “हा जुगाड बाहेर नाही जायला पाहिजे” दुसऱ्याने कमेटं केली की, “या अविष्काराला सलाम” एकाने या कॉफीला शिट्टीवाली कॉफी असेही म्हटले आहे.

Story img Loader