आजचे काळात अनेक लोक खाद्यपदार्थांवर नवनवीन प्रयोग करण्यासाठी मागे-पुढे पाहात नाही. कोणत्याही खाद्यपदार्थांवर आपली किएटिव्हिटी वापरून काहीतरी वेगळे आणि विचित्र पदार्थ तयार करतात. आजच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहून तुम्ही थक्क होऊ जाताल.. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक शाकाहारी अंड्याची रेसिपी शेअर केली आहे. होय, तुम्ही योग्य तेच वाचत आहात. हे कोंबडीचे अंड नसून तर एक महिलेने जुगाड वापरून तयार केलेले शाकाहरी अंडे आहे. एका महिलेने अत्यंत हुशारीने डाळ मसाले आणि क्रिमी पनीरपासून शाकाहारी अंडे तयार केले आहे. हे अंडे हूबेहुब अगदी कोंबडीच्या अंड्याप्रमाणे दिसते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिलेने शाकाहारी अंड्याची रेसिपी शेअर केली आहे. रेसिपीनुसार, चन्याची डाळ वाटून घ्या मग त्यात पेरी-पेरी मसाला, मॅगी मसाला,थोडेसे तेल, एक चिमुट हळद आणि पाणी मिसळा. अंड्यातील पिवळ बलक बनवण्याकरता छोटी-छोटी गोळे तयार करा. यानंतर पनीर वाटून घ्या. एक मलाईदार मिश्रण तयार करण्यासाठी कॉर्नस्टार्च आणि सैंधव मीठ मिसळू शकता. ते पीठ तयार झाल्यावर त्यामध्ये डाळीच्या पिठाचे पिवळे गोळे टाकून अंडयासारखा आकार करून घ्या. हे उकडण्यासाठी, पाणी घ्या त्यात सैंधव मीठ टाकून त्यात शाकाहारी अंड्याचे गोळे टाका. पाच मिनिटे उकडून घ्या.

हेही वाचा – घरात तंदूर नाही? मग प्रेशर कुकरमध्ये बनवा ढाबा स्टाईल तंदुरी रोटी, जाणून घ्या जुगाड

याच दरम्यान, एका दुसऱ्या पॅनमध्ये, तेल गरम करा आणि त्यामध्ये जीरे टाका, कापलेला कांदा, लसून, आले, आणि मिरचीचे वाटण टाका. मग त्यात टोमॅटो प्यूरी आणि मसाले जसे की, हल्दी, लाल मिर्च, जीरा, धने पावडर, मीठ आणि नंतर चिकन मसाला टाका. त्यात पाणी आणि कसूरी मेथी टाका. उकळी आल्यानंतर त्यात उकडलेले शाकाहारी अंडे टाका. अंड्याचे दोन काप करून टाकू शकता.

हेही वाचा – घरात तंदूर नाही? मग प्रेशर कुकरमध्ये बनवा ढाबा स्टाईल तंदुरी रोटी, जाणून घ्या जुगाड

व्हिडिओ आता पर्यंत १२ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. अनेक लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले आहे, “खूप चांगली रेसिपी, ती लपवून ठेवा.” आणखी एकाने कमेंट केली, “यार मला तर हसूच आवरत नाहीये.” दुसऱ्याने मजेशीर पद्धतीने सल्ला दिला, “पुढच्या वेळी नॉन-व्हेज वांग्याचे भरीत बनवा.