निसर्गातील चमत्कार पाहून आश्चर्यचकीत व्हायला होतं. त्यामुळे निसर्गात घडणाऱ्या अद्भुत गोष्टींचं मनुष्याला कायम कुतुहूल असतं. तंत्रज्ञानाच्या युगात कधीही न पाहिलेली दृष्य पाहणं सहज सोपं झालं आहे. त्यामुळे वन्यप्राणी आणि त्यांचं जीवन अनुभवता येतं. असेच कधीही न पाहिलेले व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सापाचं पिल्लं अंड्यातून कसं बाहेर येतं, याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने हातात सापाचे अंडे धरले आहे. या अंड्यातून साप बाहेर पडत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला भीती वाटेल. अंड्यात असलेलं सापाचे पिल्लू जीभ काढताना पाहून कोब्राची आठवण येईल. सध्या ही कोणत्या सापाची प्रजाती आहे माहीत नाही. पण आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने हातात सापाचे अंडे धरले आहे. या अंड्याच्या आत पिल्लं पूर्णपणे तयार झालं आहे. अंड्यातून साप बाहेर येण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यातून एक छोटा पिवळा साप बाहेर आल्याचं दिसतं. दोन वेळा तोंड बाहेर काढल्यानंतर तो पुन्हा अंड्याच्या आत जाण्याचा प्रयत्न करत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ snakes.empire नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.