Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असताता. जुगाडू बाईक चालवणाऱ्यांची कमतरता नाही. कोणी रिक्षाचं इंजिन बाईकला लावतेय, तर कोणी बाईकचं इंजिन काढून त्याची सायकल बनवतंय, कोणी इंधनाची टाकी काढून बाटल्या लावतोय, तर कोणी बाईकला पंखे लावून हेलिकॉप्टर बनवतंय. पण अशी बाईक तुम्ही आपल्या आयुष्यात कधीच पाहिली नसेल. एका तरुणानं चक्क चाकं नसलेली बाईक रस्त्यावर पळवली आहे. आता तुम्ही म्हणाल जर चाकंच नसतील तर बाईक धावणार तरी कशी. तर आता तुम्ही पाहा हा व्हायरल व्हिडीओ..हा व्हिडीओ पाहन तुम्हीही डोक्याला हात लावाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणांच्या क्रिएटिव्हिटीची कमी नाही, तरुण कधी काय डोकं लावतील याचा नेम नाही. वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करताना कधी एखादा हटके जुगाड करतील याचा भरोसा नाही. अशाच एका तरुणानं चक्क चाकं नसलेली बाईक चालवली आहे. असे अनेक लोक पाहायला मिळतात जे कधी कधी आपल्या कर्तृत्वाने लोकांना आश्चर्यचकित करतात, ज्याची कल्पनाही करता येत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाची झलकही काही जुगाडांमध्ये पाहायला मिळते.

चाकांशिवाय कशी धावतेय ही बाईक?

ही गाडी चाकांशिवाय इतकी सुसाट चालतेय कशी? तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला कळेल की, या तरुणानं त्याच्या बाईकची चाकं अशा पद्धतीनं लपवली आहेत की, ती कुणालाही दिसू नये. त्यानं बाईकला आरशासारखा भाग लावला आहे, त्यामध्ये रस्ता दिसत आहे. त्यामुळे आपला गोंधळ उडत आहे. त्यामुळे बघणाऱ्याला असं वाटत आहे की या बाईकला चाकंच नाहीयेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भरवस्तीत बिबट्याचा थरार; वन अधिकारीही थकले, रेस्क्यू ऑपरेशनचा खतरनाक VIDEO व्हायरल

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @latestinspace या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Have you ever seen a bike without wheels you wont believe your eyes after seeing this video srk
Show comments