सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ३ वर्षांचा एक कुत्रा टेनिस खेळताना दिसत आहे. या कुत्र्याने आपल्या तोंडामध्ये टेनिस रॅकेट पकडले आहे. विशेष म्हणजे चेंडू मारायला तो एकदाही चुकला नाही. हा व्हिडीओ Buitengebiden या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला असून हा कुत्रा कॉकर स्पॅनियल जातीचा आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत दीड लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हा कुत्रा एका मुलासोबत खेळताना दिसत आहे. मुलगा या कुत्र्याकडे बॉल फेकतो आणि कुत्रा आपल्या तोंडात पकडलेल्या रॅकेटने बॉलला मारण्याचा प्रयत्न करतो. यात तो एकदाही चुकत नाही. विशेष म्हणजे हा ४ सेकंदांचा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला असून ते सारखा हा व्हिडीओ पाहत आहेत.

Viral Photo : १० रुपयाच्या नोटेवर प्रेमीकेने प्रियकरासाठी लिहिला ‘हा’ संदेश; दोन प्रेमींना एकत्र आणण्यासाठी नेटकरी झाले एकजूट

घरातील सायकल चोरीला गेली म्हणून पठ्ठ्याने युट्यूबच्या मदतीने केला हटके जुगाड; तुम्हालाही बसणार नाही विश्वास

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला असून व्हिडीओला खूप लाइक्सही मिळाले आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “बॉलवर नजर”. या व्हिडीओवर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत या पोस्टवर ८ हजारांहून अधिक लाईक्स आणि ८०० हून अधिक रिट्विट्स आले आहेत.

Story img Loader