अनेकवेळा आपल्याला रस्त्यांवर अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. कुत्रे आणि म्हशी अनेकदा रस्त्यावर दिसतात, पण तुम्ही त्यांच्यातील मैत्री कधी पाहिली आहे का? अशीच एक मैत्री दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कुत्रा चक्क म्हशीवर स्वार होऊन फिरत आहे.
व्हिडीओ व्हायरल
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गायी आणि म्हशींचा कळप रिकाम्या रस्त्यावरून चालताना दिसत आहे. त्यात एक कुत्रा म्हशीच्या वर उभा आहे. त्या कुत्र्याला खूप भीतीही वाटते की तो खाली पडू नये पण तरीही तो म्हशींच्यावर उभा राहतोच. रस्त्यावरून जाणाऱ्या कोणीतरी हा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. जो आता चांगलच व्हायरल झाला आहे.
(हे ही वाचा: दोन जेसीबींनी मिळून केला तिसर्यावर हल्ला, मजेदार व्हिडीओ सोशल मिडीयावर Viral)
(हे ही वाचा: पिंजऱ्याचे गेट उघडताच सिंहाने केअरटेकरवर मारली उडी अन्… बघा Viral Video)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
कुत्रा आणि म्हशीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. नॉटी वर्ल्ड नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाख ८० हजार लोकांनी लाइक केला आहे, तर तो लाखो वेळा पाहिला गेला आहे. नेटीझन्सने कमेंट्स करत या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.