परदेशातून भारतात पैसा आणण्यासाठी लोक वेगवेगळी टेक्निक वापरत असतात. मात्र,पोलिसांच्या सतर्कतेमुळे परदेशातून पैसा भारतात आणणाऱ्यांवर अनेकदा कारवाई केल्याच्या घटनाही आपण पाहिल्या आहेत. परदेशातून पैसा आणण्यासाठी लोक वेगवेगळी जुगाड करतात. त्यासाठी ते कधी वेगळी कपडे तयार करतात तर कधी खाण्याच्या डब्यात वेगळा कप्पा तयार करुन घेतात. अनेकांनी तर शरीरावर शस्त्रक्रिया केल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत.
सध्या अशीच एक घटना उघडकीस आली आहे. त्याबाबतची माहिती तुम्हाला समजल्यावर तुम्ही थक्क व्हाल यात शंका नाही. कारण सध्या कोचीच्या कस्टम विभागाने अशी सोन्याची अंडी पकडली आहेत ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे कस्टम विभागाने चोर काळ्या अंड्यांसारखे दिसणाऱ्या सोन्याची वस्तू जप्त केली आहे. जी शारजाहून केरळमधील कोची येथे आणली जाणार होती.
हेही पाहा- आनंद महिंद्रांनी घेतली शेतकऱ्याच्या ट्विटची दखल, उसाचा ट्रॅक्टर बाहेर काढतानाचा Video पाहून म्हणाले…
रविवारी कोची कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिटने (AIU) शारजाहून येणाऱ्या प्रवाशाकडून अंड्यासारखी सोन्याची वस्तू जप्त केली आहेत. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. ANI आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, “कस्टम विभागाने जप्त केलेल्या ४ काळ्या अंड्यासारखे सोन्याचे कंपाऊंडचे वजन सुमारे ९००.२५ ग्रॅम असून त्याची किंमत सुमारे ४३ लाख रुपये आहे.”
हेही पाहा- भररस्त्यात बाईकवरुन जाताना जोडप्याला किस करण्याचा मोह आवरला नाही; Viral Video पाहून नेटकरीही भडकले
रविवारी शारजाहून येणाऱ्या फ्लाइट G9 426 मध्ये कस्टम अधिकाऱ्यांनी हुसैन नावाच्या एका व्यक्तीला कोची विमानतळावर ताब्यात घेतले. त्याच्याकडून हे ४३ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. हुसेन हा केरळमधील पलक्कड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शारजाह येथून सोन्याच्या तस्करी प्रकरणात त्याचा कोणत्या टोळीशी संबंध आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.