आयफोन असो किंवा प्रीमियम अँड्रॉइड स्मार्टफोन, तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे डिझाइन्स पाहिले असतील किंवा वापरले असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत जो तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल किंवा बघितला देखील नसेल. होय, आम्ही बोलत आहोत, काचेसारखा पारदर्शक आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट असलेल्या एका खास स्मार्टफोनबद्दल. तुम्हालाही या फोनबद्दल ऐकून आश्चर्य वाटले असेल तर या स्मार्टफोनचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात, हा स्मार्टफोन चांगल्या प्रकारे वापरताना देखील दाखवला गेलाय.

वाला अफशरने ट्विटरवर हा १२ मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक खास स्मार्टफोन दाखवण्यात आला असून तो ऑपरेटही केला जात आहे. पारदर्शक आरशाप्रमाणे दिसणाऱ्या या स्मार्टफोनच्या आरपार देखील दिसू शकते. त्याचा इंटरफेस अँड्रॉइड ओएसवर काम करत असल्याचे दिसते आणि ते बर्‍याच प्रमाणात रेडमीच्या इंटरफेससारखे दिसून येत आहे. मात्र, या फोनबाबत अद्याप कोणत्याही कंपनीने दुजोरा दिलेला नाही.

( हे ही वाचा: VIRAL VIDEO : कुत्रा आणि साप यांच्यातील भयानक झुंज तुम्ही पाहिली आहे का? पहा हा व्हायरल व्हिडीओ)

वायरलेस चार्जिंग देखील आहे

आरशाप्रमाणे दिसणाऱ्या या फोनमध्ये प्रीमियम स्मार्टफोनचे फीचर्सही देण्यात आले आहेत. या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सिस्टम दिसण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेला स्मार्टफोनचा वायरलेस चार्जिंग पॅड देखील पारदर्शक आहे, आणि त्याला काळ्या रंगाची केबल आहे.

वापरताना असा दिसतो पारदर्शक स्मार्टफोन

( हे ही वाचा: Viral Video : ही भयानक मगर त्याच्या मांडीवर खेळते, सगळं काही ऐकते; विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ एकदा पहाच)

हा पारदर्शक स्मार्टफोन केवळ व्हिडीओमध्ये दाखवण्यात आला नाही, तर १२ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये मोबाईलही ऑपरेट करण्यात आला आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर काही अॅप्स दाखवण्यात आले असून त्यामध्ये सेटिंग्जही ऑपरेट करण्यात आल्या आहेत.

Redmi सारखा इंटरफेस

यात महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडीओमधील दाखवण्यात आलेल्या मोबाईलमधील इंटरफेस रेडमीच्या इंटरफेससारखाच आहे आणि तो Android OS वर चालतो. हा व्हिडीओ ट्विटर व्हेरिफाईड अकाउंटवरूब पोस्ट करण्यात आला आहे

Story img Loader