प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या लग्नाचा दिवस हा सर्वात खास असतो. यामुळेच लोक अनेकदा वेडिंग लूक, फोटोग्राफी यामध्ये काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतात. आता लोक लग्नपत्रिकेवरही असे प्रयोग करू लागले आहेत. सोशल मीडियावर युनिक कार्ड दररोज व्हायरल होत असतात . ज्यांना पाहिल्यानंतर अनेकवेळा हसायला येते, तर अनेक वेळा अशी कार्डेही पाहायला मिळतात ज्यांना पाहून लोकांना आश्चर्य वाटते. सध्या असंच एक कार्ड ट्रेंडमध्ये आहे. खरं तर हे कार्ड नसून लग्नाचे आमंत्रण आहे जे औषधाच्या पॅकेटवर छापले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेल्या या लग्नपत्रिकेला पाहून प्रथमदर्शनी तुम्ही गोंधळात पडू शकता, कारण ही लग्नपत्रिका औषधांच्या पॅकेटप्रमाणे दिसते, पण जर तुम्ही नीट बघितले तर लक्षात येईल की ही औषधांचे पॅकेट नसून लग्नाची आमंत्रण पत्रिका आहे. ज्या लोकांनी हे कार्ड पाहिले ते प्रथमदर्शनी थक्क झाले. हा प्रकार तामिळनाडू येथील आहे. जिथे राहणाऱ्या एका फार्मसी शिक्षकाने आपल्या लग्नासाठी असे क्रिएटिव्ह कार्ड बनवले आहे आणि तो स्वतः याचे वाटप करायला गेला होता.

( हे ही वाचा: मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त साऱ्या शहराला दिली पार्टी; १ लाख पाणीपुऱ्या वाटणाऱ्या बापाचं CM कडून कौतुक)

येथे लग्नाचे कार्ड पहा

( हे ही वाचा: हा पक्षी निघाला कृष्णाचा भक्त! करतोय ‘हरे कृष्ण’चा जप पहा हा VIRAL VIDEO)

या चित्रात कार्डच्या वरच्या बाजूला आपले आणि आपल्या जोडीदाराचे नाव, लग्नाची तारीख, मेजवानीची वेळ तसेच लग्नाचा दिवस आणि इतर अनेक प्रसिद्ध प्रसंग नमूद केलेले दिसत आहेत. डॉक्टर दुर्गाप्रसाद हेगडे नावाच्या अकाऊंटवरून हे छायाचित्र ट्विटरवर शेअर करण्यात आले आहे. ज्याला ही माहिती देऊन शेकडो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत आणि लोक या कार्डवर कमेंट करत आपापल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका यूजरने लिहिलंय, हे पाहिल्यानंतर पाहुणे नक्कीच आश्चर्यचकित झाले असतील. दुसरीकडे, आणखी एका यूजरने मजेशीरपणे लिहिलंय, मला वाटले लग्नाच्या कार्डमध्ये त्याने औषध दिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Have you ever seen a wedding invitation printed on a medicine packet if not have a look gps