निसर्गाने मानवाला पाणी आणि जंगल या दोन अनोख्या देणग्या दिल्या आहेत. ज्यांच्या मदतीने जगात अनेक संस्कृती विकसित झाल्या आहेत. परंतु माणसाने आपल्या स्वार्थापोटी या गोष्टींचा गैरवापर केला आहे आणि त्यामुळेच निसर्गाने दिलेल्या दोन्ही देणग्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत शहरीकरण देखील झपाटयाने वाढत आहे आणि त्यामुळे जंगलातील प्राणी दिसणे दुर्मिळ झाले आहे. याच कारणामुळे जेव्हा सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित एखादा व्हिडीओ समोर येतो तेव्हा तो वेगाने व्हायरल होते. आजकाल असाच एक सुंदर हरिणाचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. हे हरीण साधेसुधे नसून पांढरे शुभ्र हरीण आहे. ज्याला तुम्ही याआधी कधीच पाहिले नसेल.
व्हिडीओमध्ये असे दिसून येतंय की, एक दुर्मिळ पांढरे हरीण पाण्यात जाते आणि स्वतःला थंड करण्यासाठी मस्त थंड पाण्यात आंघोळ करते. आपल्या शरीराला आराम देण्यासाठी आणि पाण्याचा आनंद घेण्यासाठी प्राणी ज्या प्रकारे पाण्याचा आनंद घेतात, ते दृश्य खरोखर मजेदार असते. त्यानंतर ते हरीण पाण्याच्या बाहेर येते आणि स्वत:चे अंग झटकून पाण्याचा शिरकाव करते. जे पहायला खूप सुंदर दिसते.
( हे ही वाचा: ‘माणसाचं वय सांगते’ हे अद्भुत पेंटिंग; विश्वास बसत नसेल तर हा Viral Video एकदा पहाच)
पांढऱ्या हरणाचा व्हिडीओ येथे पहा
(हे ही वाचा: Viral Video: तुम्ही कधी काचेसारखा दिसणारा स्मार्टफोन बघितला आहे का? नसेल, तर हा व्हिडीओ एकदा पहाच)
हा व्हिडीओ अवघ्या २७ सेकंदांचा असून @Gabriele_Corno नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो लोकांना प्रचंड आवडला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १.३५ मिलियन लोकांनी पहिला असून त्यावर अनेकजण आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडत आहेत.
नेटीझन्सची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून एका यूजरने सांगितले की, हे दृश्य खरोखरच नेत्रदीपक आहे की मी या प्राण्याच्या प्रेमात पडलो. दुसरीकडे, आणखी एकाने म्हंटलय प्राणी देखील अशा प्रकारे पाण्याचा आनंद घेऊ शकतात, मी हे पहिल्यांदाच पाहिले..! अप्रतिम!. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडीओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले आहे.