तुम्ही कधी घुबड पाहिले आहे का? रात्रीच्या अंधारात झाडावर बसलेले घुबड तुम्ही कदाचित पाहिले असेल. पण तुम्ही कधी घुबडाला कधी चालताना पाहिले आहे का? नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहा. व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण घुबडाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक घुबड चक्क दोन पायांवर पळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. आजच्या काळात घुबड दिसणे ही मोठी गोष्ट आहे. घुबड नेहमी झाडावरच बसलेले राहते. तो क्वचितच धावतो किंवा जमिनीवर राहतो, परंतु सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक थक्क झाले आहेत.

हेही वाचा – तीन मांजरीच्या तावडीत सापडली ‘इवलीशी चिमणी’; जीव वाचवण्यासाठी लढवली जबरदस्त शक्कल! पाहा Viral Video

एका घरामध्ये घुबड पळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. घुबड पाहिल्यानंतर ते पाळीव असल्याचे दिसते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करत आहेत. असे व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. लोकांना प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडिओ पाहणे खूप आवडते.

हेही वाचा – डोक्यावर बाइक घेऊन व्यक्तीने क्षणात बसवर चढवली; खऱ्या आयुष्यातील बाहूबलीचा व्हिडीओ व्हायरल

नुकताच हा व्हिडिओ एका सोशल मीडिया यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक पूर्णपणे थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ AMAZlNGNATURE नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७.९ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे. “हा खूप छान व्हिडिओ आहे.” आणखी एका युजरने लिहिले आहे . “मी पहिल्यांदाच घुबड चालताना पाहत आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Have you ever seen an owl running then must watch this video snk