Viral video: हल्ली तरुण पिढीला चायनीज फूडचे वेड लागले आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्यांवरचे पदार्थ अनेक जण खातात. असे काही पदार्थ विशिष्ट चवीमुळे प्रसिद्ध होतात. हातगाडीवर हे पदार्थ तयार करताना स्वच्छता बाळगली जात आहे का किंवा संबंधित हातगाडीच्या परिसरात स्वच्छता आहे का, याकडे नकळत दुर्लक्ष केलं जातं. असे पदार्थ तयार करताना किंवा हातगाडीच्या परिसरातल्या अस्वच्छतेबाबत यापूर्वी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, हे पदार्थ कुठे बनतात, कसे बनतात याबद्दल आपल्याला काही माहीत नसते. असाच एक किळसवाणा व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण सगळेच नूडल्स आवडीने खातो, सर्वच जण त्याच्यावर ताव मारताना दिसतात. मात्र, हेच नूडल्स बनवतानाचा एक किळसवाणा प्रकार सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीपासून नूडल्स तयार करण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, नूडल्स बनवणारे कर्मचारी अतिशय अस्वच्छ दिसत आहेत. त्यांचे कपडेही मळलेले आहेत. नूडल्स बनवणाऱ्या कामगारांनी आपले पूर्ण हात पिठात बुडवले आहेत. त्या ठिकाणी आजूबाजूला संपूर्ण अस्वच्छता दिसत आहे. या ठिकाणी दिवसभरात दोन हजार किलो नूडल्स बनवले जातात. या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा व्हिडीओ कोलकाताचा आहे.

हा VIDEO पाहाल तर झोप उडेल

हा व्हिडीओ एका छोट्या नूडल्स फॅक्टरीमध्ये शूट करण्यात आल्याचं दिसतंय. यात मजूर नूडल्स तयार करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे नूडल्स शिजवल्यानंतर तसेच ते जमिनीवर टाकत आहेत. अतिशय अस्वच्छ जागेत ते पॅक केले जात आहेत. हेच नूडल्स आता रस्त्याच्या कडेला चायनीजच्या गाड्यांवर जाणार आणि तिथून आपल्या पोटात. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि ठरवा यापुढे नूडल्स खायचे की नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! सरड्याला वाचवण्यासाठी तरुणाने स्वत: तोडांने दिली हवा; VIDEO चा शेवट पाहून व्हाल अवाक्

‘स्वच्छता पाळा, आजार दूर ठेवा’ असं म्हटलं जातं. त्यामागे मोठा अर्थ आहे. घर, घराचा परिसर स्वच्छ ठेवल्यास रोगराई येत नाही आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. या नियमांचं पालन अन्नपदार्थ तयार करतानादेखील महत्त्वाचं आहे; मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणाऱ्यांनी पाहिला, तर त्यांना नक्कीच धक्का बसेल.