माणूस जेव्हा एखादा खेळ खेळतो तेव्हा त्यात सर्व नियम-कायदे बनवले जातात. या नियमांनुसार खेळ खेळला जातो आणि तो जिंकण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु जंगलात असे घडत नाही. येथे प्राणी मनापासून खेळाचा आनंद घेतात, ते कोणत्याही नियमांची पर्वा करत नाहीत. असाच एक ३-४ बेबी अस्वलांदरम्यान (Baby Bears) चाललेल्या कुस्तीचा व्हिडीओ (viral video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. १७ जानेवारी रोजी शूट केलेला हा व्हिडीओ जंगलातील आहे, जिथे छोटे अस्वल खेळत आहेत. त्यांनी स्वतःसाठी कुस्ती हा खेळ म्हणून निवडला आहे आणि त्याचे पॉवर डिस्प्ले पाहून तुम्ही तुमचं हसू थांबवू शकणार नाही. असे खेळ माणसात सुरू झाले तर खेळाडूंना कोणतेही टेन्शन राहणार नाही आणि प्रेक्षकांची मजाही द्विगुणित होईल.
व्हिडीओमध्ये, अस्वलाची लहान मुले एकमेकांशी मस्ती आणि खोड्या करताना दिसत आहेत. एकूण ४ मुलांपैकी प्रत्येकी दोन मुलांचा गट करण्यात आला आहे. दोन अस्वल मागे लढत आहेत, नंतर दोन पुढे. ते एकमेकांवर झेपावतात. एकाला दुसरा जड व्हायला लागल्यावर तो तिथून निघून जातो आणि मग दुसरा तिथे पोहोचतो. ही लढाई खूप गोंडस आहे आणि मुले देखील मानवी मुलांप्रमाणे लढतात आणि मैत्री करतात.
(हे ही वाचा: Viral Video: १० कुत्र्यांवर एक मांजर ठरली वरचढ, व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल)
(हे ही वाचा: ‘ही’ व्यक्ती १० महिन्यांपासून वीज विभागाच्या कार्यालयात जाऊन वापरतेय मिक्सर, कारण…)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ फिनलंडमधील फिजिकल टीचर वालटेरी मुल्काहेनेनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. छंद म्हणून ते जंगलात फोटोग्राफी करतात. वन्य प्राण्यांची मजा त्याच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. जवळ जवळ १३ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.