काही लोकांना असे वाटते की सुंदर दृष्य आणि सुखदायक ठिकाणांची एक झलक पाहण्यासाठी आपल्याला भारताच्या बाहेर जावे लागते तर ते अत्यंत चुकीचे आहे. आपल्या देशात असे अनेक स्थान आहे जिथे पर्यटन स्थळांचा आनदं मिळू शकतो जो विदेशातील पर्यचन स्थळांना भेट देऊन मिळतो. देशात असे अनेक ठिकाणे आहेत की जी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला जर एखाद्या नैसर्गिक दृश्याचा आनंद घ्यायचा असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक पर्याय आहे, जेथे तुम्ही एकदा तरी भेट द्यायला हवी.
कालका-शिमला मार्गावरील मनमोहक दृश्यांचा पाहा व्हिडिओ
नॉर्वेजियन राजनिक एरिक सोल्हेमने एका अविश्वसनीय ठिकाणांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो भारतामधील ठिकाण आही. हा व्हिडिओ पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ कालका-शिमला मार्गावर (Kalka-Shimla route) धावणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने चित्रित केला आहे. आहे. व्हिडिओमध्ये दिसते आहे की, ट्रेन हिरवळ डोंगरांमधून जात आहे, जिथे धुक्याची हलकी चादर पसरलेली आहे.
भारतातील सर्वात सुंदर रेल्वे प्रवासांपैकी एक
हा व्हिडिओ मूळतः गो हिमाचलच्या ट्विटर पेजने शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “भारतातील सर्वात सुंदर रेल्वे प्रवासांपैकी एक! कालका शिमला रेल्वे.”
हेही वाचा – IRCTCने लेह आणि लडाख फिरण्यासाठी आणले जबरदस्त टूर पॅकेज, कमी खर्चात मित्रांसोबत काढा ट्रिप
हा व्हिडिओ आत्तापर्यंत 1 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला असून हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. लोक सुंदर निसर्ग पाहून थक्क झाले आणि त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तपशीलांची माहिती विचारू लागले. तुम्ही कधी या मार्गाने प्रवास केला आहे का? जर नसेल, तर हा अद्भुत अनुभव घेण्यासाठी तुम्हीही एकदा या मार्गावर रेल्वे प्रवास करायला जा