जेव्हा बिर्याणीचा प्रश्न येतो, तेव्हा खाद्यप्रेमी त्याच्या विविध प्रकाराबद्दल गंभीर वादविवाद करू शकतात. प्रत्येक बिर्याणीचा प्रकार त्याच्या प्रादेशिक स्वादांनी समृद्ध असतो. जेव्हा लोक त्यांच्या आवडत्या डीशवर वेगळा प्रयोग करतात तेव्हा तो प्रयोग अनेकांना आवडत नाही. अशीच एक बिर्याणी सोशल मीडियावर फिरत आहे, ज्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे व्हिडीओमध्ये

आम्ही बोलत आहोत चायनीज बिर्याणीबद्दल. होय, आपण बरोबर ऐकले. एका युट्युबरद्वारे शेअर केलेली ही डिश खूप व्हायरल झाली आहे. हा व्हिडीओ मात्र गेल्या वर्षी पब्लिश झाला होता. जर तुम्ही त्या बिर्याणीच्या डिशकडे बारकाईने पाहिले तर चिकन आणि भाज्यांसह शिजवलेली ही अभिनव बिर्याणी चायनीज फ्राईड राईस सारखीच दिसते.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला आत्तापर्यंत ८.९४ लाख लोकांनी बघितलं आहे. जवळ जवळ दोन हजार नेटीझन्सने यावर कमेंट्स केल्या आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला, पाकिस्तानातील एका माणसाने ‘स्ट्रॉबीर्यानी’ किंवा स्ट्रॉबेरी बिर्याणीचा फोटो शेअर केला जो झटपट व्हायरल झाला. फोटोत ताज्या स्ट्रॉबेरीसह बिर्याणी तांदळाचा एक मोठा पॅन होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Have you ever tried chinese biryani watch the viral video ttg