Viral funny video: सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी एखाद्या क्षणाचे असतात, तर काही व्हिडीओ हे फारच मजेदार असतात, जे आपल्याला पोटभर हसवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून त्यावर काय म्हणावं हेच तुम्हाला कळणार नाही. पण तुम्ही नक्कीच तो पाहिल्यानंतर पोटधरुन हसाल.

आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतोच; त्याशिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. योगाचे फायदे पाहता आता अनेकजणांनी योगा करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच वेळा गृहिणींना, महिलांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही मात्र त्याही आता स्वत:साठी वेळ काढतात. अशाच एका काकूंचा योगा करतानाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. अतिउत्साहात काकूंनी असा काही योगा केलाय की तुम्हीही पोट धरुन हसाल. तसेच एखाद्या लहान मुलानं जर या काकूंना पाहिलं तर ते घाबरून जातील. आता तुम्ही म्हणाल असा कोणता व्यायाम केलाय काकूंनी? तर तुम्हीच पाहा.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा
Funny video Drunk man doing dance at a haladi ceremony funny video viral social media
देशी दारु अशी चढली की…हळदीला भर मांडवात काकांनी काय केलं पाहा; कोकणतल्या हळदीचा Video पाहून पोट धरुन हसाल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही महिला साडीमध्येच योगा करण्यासाठी सकाळी एके ठिकाणी जमल्या होत्या. यावेळी सर्व महिला आपापल्या योगा मॅटवर उभ्या असून त्यांच्या समोर एक महिला उभी आहे, जी त्यांना योगा करायला शिकवत आहे. समोर उभी असलेली महिला आपले दोन्ही हात हवेत उंचावून, जीभ बाहेर काढून, डोळे पूर्णपणे उघडून योगासन करत आहे. अशाप्रकारचा योगा क्वचित कोणी पाहिला असेल. यावेळी सर्व महिलादेखील या प्रकारचा योगा करू लागतात. ज्यांना हे योगासन ठाऊक आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट नॉर्मल आहे. पण, ज्यांना हे योगासन ठाऊक नाही ते लोक नक्कीच घाबरतील.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रिलसाठी काहीही! रील बनवण्यासाठी तरुणाने दुचाकीने ओढली ट्रेन; धोकादायक स्टंटचा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ @BapuDaLadla या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ४ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय काकू थोडं दमानं तर दुसऱ्या युजरने कमेटं केलीय,”बाई काय हा प्रकार” तुम्हाला हा योगा कसा वाटला? हे आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.

Story img Loader