जीन्सशिवाय आपले कपाट रिकामेच! या पाश्चिमात्य पेहरावाला आपण इतके आपलेसे केले आहेत की जीन्सशिवाय दुसरे आरामदायी कपडे नसतील असे वाटू लागले आहे. ही जीन्स तुम्ही कधी नीट पाहिली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे या जीन्सला चार खिशांव्यतिरिक्त एक छोटा कप्पाही असतो. हा कप्पा का असतो हे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही म्हणाल कदाचित चिल्लर पैसे ठेवण्यासाठी हा छोटा खिसा असू शकेल. पण तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. कारण प्रत्येक जीन्सला असणारा छोटासा कप्पा हा मुळात चिल्लर ठेवण्यासाठी बनवण्यात आला नाही.
पूर्वी पुरुषांच्या जीन्सला असे छोटे कप्पे असायचे. १९व्या दशकाच्या सुरूवातीला साखळी असणा-या घड्याळांची फॅशन होती. तेव्हा आतासारखे मनगटी घड्याळही नव्हते. त्यामुळे पुरुष हे घड्याळ आपल्या कोटामधल्या खिशात ठेवायचे. जसजसा वेश बदलला आणि जीन्स आल्या तशी ही साखळी घड्याळे नक्की ठेवायची कुठे असा प्रश्न पडू लागला. म्हणूनच अनेक जीन्स बनवणा-या कंपन्यांनी जीन्स पँटला खिशांवर एका छोटा कप्पा दिला. ज्यात हे घड्याळ अत्यंत सुरक्षितरित्या राहू शकते. तसेच छड्याळ्याच्या डायच्या आकाराचा हा कप्पा असल्याने ते त्यातून पडण्याची शक्यताही नव्हती. हळूहळू काळानुसार साखळी घडाळांची फॅशन गेली त्याजागी मनगटी घड्याळांची फॅशन आली. पण जीन्स पँटवर असणाऱ्या छोट्या खिशांची फॅशन मात्र कायम तशीच राहिली.